W, 0, W, W, W… ५ चेंडूत ४ विकेट्स घेत मारली बाजी; शेवटच्या षटकात हरलेला सामना जिंकला, पाहा VIDEO

TNPL 2025 Surya Anand 4 wickets 5 balls : टीएनपीएल २०२५ मध्ये सूर्या आनंदने अविश्वसनीय कामगिरी करत सिचम मदुरै पँथर्सला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात मदुरै पँथर्सने नेल्लई रॉयल किंग्सचा १० धावांनी पराभव केला. एका वेळी रॉयल किंग्सला १२ चेंडूत ११ धावांची गरज होती आणि ४ विकेट्स हातात होत्या होते, परंतु सूर्या आनंदच्या शानदार कामगिरीने सामन्याचा निकाल पलटला. सूर्या आनंदने अवघ्या ५ चेंडूत ४ विकेट्स घेत थराररक सामन्यात मदुरै पँथर्सला अविश्वसनीय विजय मिळवून दिला.
रोमांचक सामन्यात सूर्या आनंदचा कहर –
नेल्लई रॉयल किंग्ससाठी हा एक वाईट दिवस होता. त्यांना १२ चेंडूंमध्ये फक्त ११ धावांची गरज होती, पण तरीही त्यांनी सामना गमावला. ज्यामुळे हा सामना टीएनपीएलच्या इतिहासात नोंदला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मदुरै पँथर्सने १६८ धावा केल्या होत्या. बलचंदर अनिरुद्ध आणि अतीक उर रहमान यांनी अनुक्रमे ४८ आणि ३६ धावा केल्या. नेल्लई रॉयल किंग्सचा कर्णधार अरुण कार्तिकने ६७ धावा केल्या, पण त्यांचा संघ पराभूत झाला. सूर्या आनंदने उत्कृष्ट गोलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
५ चेंडूंत घेतल्या ४ विकेट्स –
Surya goes 𝐖𝐎𝐖𝐖𝐖 in the 19th over and delivers a stunning win for Madurai Panthers! @TNCACricket @maduraipanthers #TNPL #NammaOoruNammaGethu #TNPL2025 pic.twitter.com/qX6gRMMNen
— TNPL (@TNPremierLeague) June 19, 2025
सूर्या आनंद पँथर्सचा नवा हिरो म्हणून उदयास आला आहे. त्याने सिद्ध केलं की फक्त फलंदाजच नव्हे, तर गोलंदाजही सामना जिकवून देऊ शकतात. त्याने २३ चेंडूंमध्ये ४ विकेट्स घेतल्या आणि फक्त २४ धावा दिल्या. त्याच्या सर्व विकेट्स १९व्या षटकात आल्या, त्या सुद्धा अवघ्या ५ चेंडूंमध्ये. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सूर्याने विकेट घेतली. त्यानंतर दुसरा चेंडू डॉट ठरला आणि पुढील ३ चेंडूंवर त्याने सलग ३ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी सूर्या आनंदला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
हेही वाचा – IND vs ENG : साई सुदर्शनचं पदार्पण, करुण नायरचं पुनरागमन! पाहा टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
या सामन्यात जर नेल्लई रॉयल किंग्जने विजय मिळवला असता, तर ते पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले असते. पण आता ते चार सामन्यांतून चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. सूर्या आनंदमुळे मदुराई पँथर्सना पॉइंट टेबलमध्ये फायदा झाला आहे. ते चार गुणांसह सहाव्या स्थानावर आहेत. अशात टीएनपीएल २०२५ चा हंगाम रोमांचक टप्प्यात पोहोचला आहे. कारण चारही संघांचे गुण समान आहेत.



