R Ashwin : अश्विनचा संताप! लेग-स्टंपच्या बाहेर चेंडू, तरीही LBW; पंचांशी भिडला, पाहा VIDEO

R Ashwin Angry on Umpire in TNPL 2025 : आर अश्विनचा रागीट फॉर्म तामिळनाडू प्रीमियर लीग २०२५ मध्ये दिसून आला. रविवार, ८ जून रोजी आयड्रीम तिरुप्पूर तमिझान्स विरुद्ध साई किशोरच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू दिल्यानंतर डिंडीगुल ड्रॅगन्सचा कर्णधार आणि भारताचा अनुभवी खेळाडू रविचंद्रन अश्विन संतापला. त्याने महिला पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर, त्याने पॅव्हेलियनकडे जाताना रागाने त्याच्या पॅडवर बॅट मारली. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत होत आहे.
अश्विन महिला अंपायरच्या निर्णयावर संतापला –
हा ड्रामा पहिल्या डावातील पाचव्या षटकात घडला. साई किशोरने लेग-स्टंपवर गुड लेन्थचा, लूप असलेला चेंडू टाकला. अश्विन स्वीप शॉट खेळण्यासाठी खाली वाकला, पण डावखुर्या फिरकी गोलंदाजाचा चेंडू वेगाने वळल्याने तो हुकला आणि पॅडवकर लागला. यानंतर गोलंदाजाने आणि यष्टीरक्षकाने जोरदार अपील केल्याने पंचांनी बोट वर केले, ज्यामुळे अश्विन प्रचंड नाराज झाला. त्यानंतर त्याने महिला पंचाला समजावण्याचा प्रयत्न केला की चेंडू लेग-स्टंपच्या बाहेर पडला होता. तरीही, पंच आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि अश्विनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. ज्यामुळे तो प्रचंड संतापला.
अश्विनने रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट –
Ash அண்ணா Not Happy அண்ணாச்சி! 😶🌫
📺 தொடர்ந்து காணுங்கள் | TNPL 2025 | iDream Tiruppur Tamizhans vs Dindigul Dragons | Star Sports தமிழில் #TNPLOnJioStar #TNPL #TNPL2025 pic.twitter.com/Csc2ldnRS3
— Star Sports Tamil (@StarSportsTamil) June 8, 2025
आउट दिल्याने अश्विन खूपच रागवला होता, ज्यामुळे त्याने तंबूत माघारी जात असताना आपली बॅट पॅडवर जोरात मारली आणि मैदानाबाहेर निघून गेला. रीप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच झाला होता. यावरून अश्विनचा राग रास्त होता असं म्हणता येईल. अश्विनने गेल्या वर्षाच्या शेवटी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, त्यानंतर त्याची कामगिरी सातत्याने घसरत गेली. या हंगामात आयपीएलमध्येही त्याला चेन्नई सुपर किंग्जसाठी चांगली कामगिरी करता आली नाही. या हंगामात त्याला फक्त ७ विकेट्स घेता आल्या.
सामन्याबद्दल बोलायचे तर, आयड्रीम तिरुप्पुर तमिझान्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना डिंडीगुल ड्रॅगन्सचा संपूर्ण संघ १६.२ षटकांत ९३ धावांवर सर्वबाद झाला. ज्यामध्ये अश्विनने १८, शिवम सिंगने ३० आणि आरके जयंतने १८ धावा केल्या. तमिझान्सकडून गोलंदाजी करताना साई किशोरने २ आणि एसाकिमुथु अ ने ४ बळी घेतले. प्रत्युत्तरात, तमिझान्सने या लहान लक्ष्याचा पाठलाग केला आणि ११.५ षटकांत एक विकेट गमावून सामना जिंकला. यष्टीरक्षक तुषार रहेजाने ३९ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय अमितने १३ आणि राधाकृष्णनने १४ धावा केल्या.





