IND vs ENG : साई सुदर्शनचं पदार्पण, करुण नायरचं पुनरागमन! पाहा टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

IND vs ENG 1st Test Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिला सामना लीड्समधील ऐतिहासिक हेडिंग्ले मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यातने इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. भारताकडून या सामन्यात साई सुदर्शनला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर करुण नायरचे सात वर्षांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. विशेष म्हणजे नितीश रेड्डी आणि कुलदीप यादव यांसारखे खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून वगळले गेले आहेत.
We are set for the series opener 👌 👌#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/xAbVDUsUdp
— BCCI (@BCCI) June 20, 2025
इंग्लंडमधील हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने आतापर्यंत एकूण ७ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी दोन सामन्यांत विजय मिळवला, तर चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला. एक कसोटी सामना अनिर्णित राहिला. या मैदानावर भारताने शेवटचा कसोटी सामना २००२ मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. त्या सामन्यात भारताने एक डाव आणि ४६ धावांनी विजय नोंदवला होता.
पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:
भारत: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.
इंग्लंड: झॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.





