TNPL 2025 : LIVE सामन्यात बॅटचे दोन तुकडे; गोलंदाजांचे डोके थोडक्यात बचावले (Video)

क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना अनेकवेळा खेळाडूंची बॅट तुटते. 9 जून रोजी टीएनपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यातदेखील एका फलंदाजाच्या बाबतीत असाच प्रकार घडला. यामध्ये 24 वर्षीय सलामीवीर फलंदाजाच्या बॅटचे दोन तुकडे झाले. या घटनेमुळे गोलंदाज थोडक्यात बचावला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
काय घडले नेमके?
9 जून रोजी चेपॉक सुपर गिलीज आणि नेलाई रॉयल किंग्ज यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात चेपॉक सुपर गिलीजने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 गडी गमावून 212 धावा केल्या. 24 वर्षीय सलामीवीर के आशिकने चेपॉकसाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने 38 चेंडूंचा सामना केला आणि 142 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 54 धावा केल्या.
BAT BROKEN INTO 2 PIECES IN TNPL 🥶 pic.twitter.com/5wy6pJLpq7
— Johns. (@CricCrazyJohns) June 10, 2025
त्याच्या धमाकेदार खेळीदरम्यान, के. आशिक 18 धावांवर खेळत होता, तेव्हा त्याची बॅट मध्येच तुटली. त्याचे दोन तुकडे झाले. के. आशिकची बॅट तुटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता के. आशिक याची बॅट तुटल्यामुळे गोलंदाज थोडक्यात बचावला आहे. गोलंदाजाच्या पायाला हि तुटलेली बॅट लागली.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर के. आशिकच्या झंझावाती 54 धावांमुळे चेपॉक सुपर गिलीजने 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात, नेलाई सुपर किंग्ज 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 171 धावाच करू शकले आणि सामना गमावला. चेपॉक सुपर गिलीजने हा सामना 41 धावांनी जिंकला. टीएनपीएल 2025 मध्ये हा त्यांचा सलग दुसरा विजय होता.





