Maharashtra Politics : शिंदेच टेन्शन वाढलं ! 6 खासदारांच्या बंडखोरीबाबत सुप्रीम कोर्टाचं मोठं पाऊल
महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सहा बंडखोर खासदारांविरोधात ठाकरे गटाने आक्रमक पाऊल उचलले असून, या प्रकरणात थेट सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस बजावण्यात आली आहे. खासदार अरविंद सावंत यांचे स्वीय सहाय्यक दीपक घोगल हे मुंबईहून नोटीस घेऊन थेट संजय देशमुख यांच्या चिंचोली येथील निवासस्थानी पोहोचले.
या वेळी मुंबईतील पदाधिकाऱ्यांसह (Maharashtra Politics) यवतमाळचे जिल्हाप्रमुख आणि स्थानिक ठाकरे सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे.
विशेष म्हणजे, नोटीसमध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की बंडखोर खासदार न्यायालयात हजर न राहिल्यास त्यांच्या अनुपस्थितीतच एकतर्फी सुनावणी घेतली जाईल, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काही महिन्यांपूर्वी यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख यांच्यासह धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, परभणीचे संजय जाधव, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर या सहा खासदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता.
हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का (Maharashtra Politics) मानला जात होता. आता या सर्व खासदारांच्या अपात्रतेसाठी ठाकरे गटाने कायदेशीर लढाई तीव्र केली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या या नोटिसीमुळे शिंदे गटातील बंडखोर खासदारांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






