Pankaja Munde : “सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करेल” – पंकजा मुंडे
मुख्यमंत्री फडणवीस हे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सज्ज आहेत. हंगामी पावसाच्या कमतरतेचा सोयाबीनसारख्या पिकांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे.

Pankaja Munde – अपुऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची दिवाळी देवेंद्र फडणवीस सरकार गोड करेल, अशी ग्वाही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
यातून त्यांनी शेतकऱ्यांना आणखी मदत मिळण्याचे संकेत दिले आहेत. मुंडे या बीडमधील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होत्या. राज्य सरकारने या जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहे.
मुंडे म्हणाल्या, राज्य सरकारने यापूर्वीच ३२,००० कोटी रुपयांची पीक कर्जमाफी जाहीर केली आहे. शेतकऱ्याला मिळणाऱ्या नुकसानभरपाईची गणना करण्यासाठी असलेल्या विहित सूत्रानुसार (फॉर्म्युला) मिळणाऱ्या रकमेपेक्षा अधिक भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने पहिल्यांदाच केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सज्ज आहेत. हंगामी पावसाच्या कमतरतेचा सोयाबीनसारख्या पिकांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे.
पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले असून उत्पादनात मोठी घट होईल, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये बहुतांश तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचाही समावेश आहे, असे त्यांनी म्हटले.





