Prithviraj Chavan : “ज्ञानेश कुमारांनी जे काही केले, ते बेकायदेशीर” – पृथ्वीराज चव्हाण
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार गुप्ता यांनी आपल्या कार्यकाळात जे काही केले आहे, ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यांनी संसदेने केलेल्या कायद्याचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आयुक्तांच्या अधिकाराबद्दलच्या निकालाचे उल्लंघन केले आहे.

Prithviraj Chavan – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पूर्णपणे बेकायदेशीरपणे काम केले असून निवडणूक आयुक्तांच्या अधिकारांबाबतच्या संसदीय कायद्याचे उल्लंघन केले आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच, त्यांनी कुमार यांना निवडणूक आयोगाच्या पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, असे सांगत चव्हाण यांनी आरोप केला की, कुमार आपल्या पक्षपाती धोरणांमुळे कोणालातरी बेकायदेशीरपणे निवडणुका जिंकण्यास मदत करत आहेत.
चव्हाण यांनी आपल्या एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले की, मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार गुप्ता यांनी आपल्या कार्यकाळात जे काही केले आहे, ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यांनी संसदेने केलेल्या कायद्याचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आयुक्तांच्या अधिकाराबद्दलच्या निकालाचे उल्लंघन केले आहे.
निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी लेखी केलेल्या विरोधावरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त हे मनमानी कारभार करत असल्याच्या तक्रारींबाबत दोन निवडणूक आयुक्तांनी १४ पत्रे लिहिली आहेत.
कायद्यात स्पष्टपणे नमूद आहे की, निवडणूक आयोगाचे निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतले जावेत. त्यामुळे दोन आयुक्तांनी बहुमताने व्यक्त केलेले मत हे आयोगाचा निर्णय म्हणून ग्राह्य धरले पाहिजे.
ज्ञानेश कुमार हे निवडणुकीतील पक्षपाती धोरणामुळे कोणाला बेकीयदेशिरपणे निवडणुका जिंकायला मदत करत होते? भारतीतील लोकशाही टिकवायची असेल तर त्यांची त्वरित हकालपट्टी केली पाहिजे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.






