Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांना मोठा दिलासा! सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वैध
Gopichand Padalkar : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.

Gopichand Padalkar : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरला आहे. (Gopichand Padalkar)
कोल्हापूर खंडपीठांमध्ये पार पडलेला सुनावणीमध्ये त्यांचा अर्ज अवैध ठरवला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना बँकेची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला. (Gopichand Padalkar)
आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत सोसायटीमधून आपला अर्ज दाखल केला होता. पडळकर यांनी बँकेच्या निवडणूक लढण्यासाठी जोडलेली कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप माजी आमदार विक्रम सावंत आणि बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांनी केला होता. (Gopichand Padalkar)
परंतु या आरोपानंतरही सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज वैध ठरवला होता. या निर्णयाविरोधात दोघांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेतली होती. (Gopichand Padalkar)





