Varun Aaron : IPL 2026 पूर्वी SRH चा मोठा निर्णय, भारताच्या माजी खेळाडूची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती

सोशल मीडियाद्वारे एसआरएचने दिली माहिती –
सनरायझर्स हैदराबादने सोशल मीडियावर माहिती देत सांगितले की, आयपीएल २०२५ मध्ये त्यांचे गोलंदाजी प्रशिक्षक न्यूझीलंडचे माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू जेम्स फ्रँकलिन होते. मात्र, पुढील हंगामात ते संघासोबत नसतील. त्यांच्या जागी आता वरुण आरोनची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. वरुणच्या येण्याने एसआरएचच्या गोलंदाजी युनिटमध्ये कोणते बदल होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
View this post on Instagram
सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावर वरुण आरोन यांच्याबद्दल सांगताना म्हटले, “आमच्या प्रशिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये एक उत्तम भर पडली आहे. वरुण आरोन यांचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून स्वागत!” वरुणने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १८ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये ५२ सामने खेळले आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : वैभव सूर्यवंशीची गोलंदाजीतही कमाल! सर्वात कमी वयात रचला इतिहास!
वरुण आरोनची कारकीर्द –
वरुण आरोन आयपीएलमध्ये सहा संघांसाठी खेळला आहे. यामध्ये किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांचा समावेश आहे. त्यानी भारतासाठी ९ कसोटी आणि ९ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले आहेत. परंतु आता तो त्या संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनला आहेत, ज्यासाठी त्यानी आयपीएलमध्ये एकही सामना खेळलेला नाही.
हेही वाचा – IND vs ENG : लाइव्ह सामन्यात जडेजा-कार्स यांच्यात तुफान राडा, VIDEO होतोय व्हायरल
वरुण आरोनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण ५२ सामने खेळले, ज्यामध्ये त्यानी ५० डावांमध्ये ४४ विकेट्स घेतल्या. त्याची सर्वोत्तम कामगिरी १६ धावांत ३ विकेट्स होती. त्यानी २०११ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) कडून खेळत आयपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि शेवटचा २०२२ मध्ये आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने कसोटीत १८ आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या.





