IND vs ENG : लाइव्ह सामन्यात जडेजा-कार्स यांच्यात तुफान राडा, VIDEO होतोय व्हायरल

IND vs ENG Jadeja-Carse Clash Amid Tense Chase : भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेला तिसरा कसोटी सामना चुरशीच्या टप्प्यावर आहे. पाचव्या दिवशी भारताची सुरुवात निराशाजनक झाली. ऋषभ पंत ९ धावांवर जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. केएल राहुलने ३९ धावा केल्या, पण तोही बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरला आर्चरने खाते न उघडताच बाद केले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सलग तीन गडी बाद करत सामन्यावर वर्चस्व मिळवले. दरम्यान ब्रायडन कार्स आणि रवींद्र जडेजा एकमेकांना धडकल्याने वाद निर्माण झाला.
जडेजा-कार्स यांच्यात झाला वाद –
सामन्यादरम्यान रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा गोलंदाज ब्रायडन कार्स यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ३५व्या षटकात जडेजाने कार्सच्या चेंडूवर फटका मारला आणि धाव घेण्यासाठी धावला. यावेळी चेंडूकडे लक्ष असल्याने जडेजाला समोर उभा असलेला कार्स दिसला नाही आणि दोघांमध्ये धडक झाली. यानंतर कार्स संतापला आणि जडेजाला काहीतरी बोलायला लागला. यानंतर जडेजानेही प्रत्युत्तर देताना सांगितले की त्याचे लक्ष नव्हतं. त्यानंतरही दोघांमधील बाचाबाची वाढत असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला मध्यस्थी करावी लागली.
Clash between JADEJA & CARSE at the lords test day 5.#INDvsENGTest #LordsTest pic.twitter.com/pRIEBFClH9
— 269 | Ee Sala Cup Namdu (@kohlisphere_) July 14, 2025
जोफ्रा आर्चरने केला कहर –
#FLASH: #INDvENG Lord’s Test Drama:
Ravindra Jadeja and Brydon Carse collide mid-run — followed by a tense exchange of words!
A bit of WrestleMania comes to the Home of Cricket!
Reports @Kalagraphe88134 #Lord’s #ENGvIND #Jadeja #CricketClash #TestDrama #ViralMoment pic.twitter.com/H6fnF5K0ri
— The New Indian (@TheNewIndian_in) July 14, 2025
लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवसाची सुरुवात टीम इंडियासाठी चांगली झाली नाही. जोफ्रा आर्चरच्या एका शानदार चेंडूवर रिषभ पंत क्लीन बोल्ड झाला. पंत बाद झाल्यानंतर, संघाच्या धावफलकावर फक्त १० धावा जोडल्या गेल्या, तेव्हा केएल राहुल देखील ३९ धावा काढून बेन स्टोक्सचा बळी ठरला. यानंतर फक्त एका धावेनंतर, आर्चरने वॉशिंग्टन सुंदरला खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. अशा प्रकारे आर्चरने भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला.
हेही वाचा – IND vs ENG : भारताला हरवण्याचा पॅटर्न? अश्विनने उघड केलं पंच पॉल रायफलचं सत्य
भारताला ७५ धावांची गरज –
Ravindra Jadeja vs Brydon Carse heated moment at Lord’s after they both collided in the middle of the pitch.
Its heating up at Lord’s.🥵🔥#ENGvIND #LordsTest #Lords pic.twitter.com/MGe6HTAw1j
— 🅒🅡🅘︎🅒︎🄲🅁🄰🅉🅈𝗠𝗥𝗜𝗚𝗨™ 🇮🇳❤️ (@MSDianMrigu) July 14, 2025
दरम्यान या रोमांचक सामन्यात इंग्लंडच्या खेळाडूंनी भारतीय फलंदाजांना चिथावण्याचा प्रयत्न अनेकदा केला. परंतु, भारतीय फलंदाज जडेज आणि रेड्डीने लक्ष विचलीत होऊ दिले नाही. मात्र, काही वेळानंतर नितीश रेड्डीच्या रुपाने भारतीय संघाला आठवा धक्का बसला. तो १३ धावा काढून बाद झाला. तत्पूर्वी त्याने जडेजासोबत ३० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकराली. सध्या खेळपट्टीवर जडेजा-बुमराह फलंदाजी करत असून भारताची धावसंख्या ८ बाद ११८ धावा आहे. त्यामुळे विजयासाठी अजून ७५ धावांची गरज आहे.





