IND vs ENG : वैभव सूर्यवंशीची गोलंदाजीतही कमाल! सर्वात कमी वयात रचला इतिहास!

IND vs ENG Vaibhav Suryavanshi Sets Record Youth Test : आयपीएल २०२५ मध्ये वैभव सूर्यवंशीने उत्तम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधलं होतं. त्याने सर्वात कमी वयात अर्धशतक आणि शतक झळकावून इतिहास रचला होता. त्यानंतर वैभव सूर्यवंशी इंग्लंडच्या भूमीवर धुमाकूळ घालत आहे. पण आता वैभवने इंग्लंडविरुद्ध गोलंदाजीत धुमाकूळ घातला आहे. त्याने गोलंदाजी करताना विकेट घेत नवा इतिहास रचला आहे. तो असा पराक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडूही बनला आहे.
वैभव सूर्यवंशीने गोलंदाजीतही रचला इतिहास-
वैभव आतापर्यंत त्याच्या बॅटने धुमाकूळ घालत होता. पण आता त्याने गोलंदाजीतही आपला कल दाखवून इतिहास रचला आहे. इंग्लंड अंडर-१९ विरुद्धच्या युवा कसोटी सामन्यात वैभवने ६ षटके गोलंदाजी केली आणि इंग्लंडचा कर्णधार हमजा शेखची विकेट घेतली. वैभवने विकेट घेताच त्याचे नाव इतिहासाच्या पानांवर नोंदवले गेले. तो युवा कसोटीत भारतासाठी सर्वात कमी वयाचा विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने १४ वर्षे १०७ दिवसांच्या वयात ही कामगिरी केली आहे.
याआधी, वैभवने इंग्लंड अंडर १९ विरुद्धच्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही शतक झळकावले होते. त्याने ५२ चेंडूत शतक झळकावून कहर केला. या शतकामुळे वैभव युवा एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. गेल्या पाच डावांबद्दल बोलायचे झाले तर, वैभवने ३३, १४३, ८६, ४५ आणि ४८ धावा केल्या आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : लाइव्ह सामन्यात जडेजा-कार्स यांच्यात तुफान राडा, VIDEO होतोय व्हायरल
आयपीएल २०२५ चा हंगाम राहिला होता शानदार –
वैभवने आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून भाग घेतला. फ्रँचायझीने त्याला १.१ कोटी रुपये खर्च करून त्यांच्या संघाचा भाग बनवले. पण वैभवने त्याच्या संघाला निराश केले नाही. त्याने ७ सामन्यांमध्ये २२२ धावा केल्या. या दरम्यान त्याच्या बॅटमधून १ शतक आणि १ अर्धशतक झळकले. वैभवने आयपीएलमध्ये १०६.५५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली होती.





