Sunetra Pawar : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीच्या राजकारणात मोठे बदल होताना दिसत आहेत. पोटनिवडणुकीत विक्रमी विजय मिळवल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आता केवळ बारामतीपुरत्याच मर्यादित नसून भविष्यात मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार म्हणूनही पुढे येऊ शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे. (Sunetra Pawar) राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना अधिकच जोर आला आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेसाठी जय पवार यांचे नाव चर्चेत होते. मात्र, “मी इथेच सर्वांसाठी काम करणार,” असे सांगत त्यांनी खासदारकीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. (Sunetra Pawar) दरम्यान, २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना जय पवार म्हणाले की, “बारामतीकरांची इच्छा होती की दादांना एकदा मुख्यमंत्री म्हणून पाहायचं. आता वहिनी खूप मेहनत घेत आहेत. मला वाटतं २०२९ मध्ये बारामतीतून सुनेत्रा पवारच निवडणूक लढवतील आणि मुख्यमंत्री म्हणून ती जागा त्यांनी मिळवावी, ही आमची अपेक्षा आहे.” (Sunetra Pawar) या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले असले, तरी सुनेत्रा पवार त्या माध्यमातून दादांची इच्छा पूर्ण करतील, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. (Sunetra Pawar)