Jay Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते जय अजित पवार यांनी आज बारामती येथे नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी ‘जनता दरबारा’ची यशस्वी सुरुवात केली. त्यांच्या या पहिल्याच उपक्रमाला बारामतीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ज्यामुळे स्थानिक राजकारणात जय पवार यांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जय पवार अॅक्शन मोडवर… (Jay Pawar) जनता दरबारात आलेल्या नागरिकांच्या विविध समस्या जय पवार यांनी ऐकून घेतल्या. केवळ समस्या ऐकून न थांबता, त्यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि अनेक प्रलंबित प्रश्न जागेवरच मार्गी लावले. प्रशासकीय दिरंगाई दूर करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या त्यांच्या या कार्यपद्धतीचे नागरिकांनी स्वागत केले. यावेळी जय पवार यांनी उपस्थित नागरिकांशी अतिशय जिव्हाळ्याने संवाद साधला. Jay Pawar : जय पवार यांच्या पहिल्याच जनता दरबाराला मोठा प्रतिसाद; बारामतीत नवा अध्याय सुरू दर गुरुवारी जनता दरबार (Jay Pawar ) बारामतीतील जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी सातत्य राहावे, या उद्देशाने जय पवार यांनी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे दर आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी जय अजित पवार जनता दरबाराच्या माध्यमातून बारामतीकरांच्या भेटीला येणार आहेत. यामुळे नागरिकांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. Jay Pawar हेही वाचा: Dharma Dhwaja : अयोध्येतील राम मंदिरानंतर नाशिकच्या काळाराम मंदिरावर ऐतिहासिक धर्मध्वजाची स्थापना…