Paris Olympics 2024 (Men’s 10m Air Rifle Event) : अर्जुन बाबूताची अंतिम फेरीत धडक..

Paris Olympics 2024 (Men’s 10m Air Rifle Event) : भारताच्या अर्जुन बाबूताने 10 मीटर एअर रायफल पुरुष एकेरीत शानदार प्रदर्शन केले आहे. त्याने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बाबूताने एकूण 630.1 गुण मिळवले. मात्र, याच स्पर्धेत भारताच्या संदीप सिंगने 12वे स्थान पटकावल्याने तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.
भारताचा अर्जुन बाबूता 10 मीटर एअर रायफल पुरुषांच्या पात्रता स्पर्धेत सातव्या स्थानावर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. बाबूताने एकूण 630.1 गुण मिळवले. तथापि, दुसरा भारतीय नेमबाज संदीप सिंग याने 629.3 गुण मिळवले.
Shooting: Arjun Babuta qualified for the Men’s 10m Air Rifle event.#Paris2024 #Cheer4Bharat #Olympics #Shooting pic.twitter.com/8ocH5a7dWx
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 28, 2024
अंतिम फेरीत पात्र ठरण्यासाठी पहिल्या आठमध्ये स्थान मिळवणे गरजेचे असते,मात्र संदीप हा 12 व्या स्थानावर राहिला. अर्जुन उद्या दुपारी (दि.28 जुलै,सोमवार) 3.30 वाजल्यापासून त्याचा अंतिम सामना खेळणार असून सुवर्णपदकासाठी प्रयत्न करणार आहे.
दुसरीकडे, भारतीय महिला नेमबाज मनू भाकरने इतिहास रचला आहे. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.





