श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिकेचा नवा शो येणार भेटीला? फोटोंमुळे चर्चेला उधाण

Shreya Bugde And Kushal Badrike : झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. आजही प्रेक्षक या कार्यक्रमाचे जुने एपिसोड आवडीने पाहतात. अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. हा कार्यक्रम बंद झाला असला तरीही डॉ. निलेश साबळे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे हे कलाकार घराघरात पोहोचले.
‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर हे कलाकार वेगवेगळ्या कार्यक्रमात काम करताना दिसत होते. मात्र, आता कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे पुन्हा एकत्र आले आहेत. दोघांनी एकमेकांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर दोघेही कलाकार पुन्हा एकदा कार्यक्रमात एकत्र झळकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
View this post on Instagram
दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत झी मराठीलाही टॅग केले आहे. सोबतच, #Shootday असा हॅशटॅग देखील वापरला आहे. त्यामुळे हे कलाकार पुन्हा एकदा नवीन कार्यक्रमात सोबत झळणार असल्याची चर्चा आहे.
दोन्ही कलाकार झी मराठीवरील कार्यक्रमात पुन्हा एकत्र काम करताना पाहायला मिळू शकतात. ते कोणत्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीला येणार आहेत, त्याबाबतची माहिती समोर आलेली नाही. मात्र, दोन्ही कलाकारांना एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ नंतर कुशल मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कार्यक्रमात दिसला होता. तर ‘ड्रामा ज्युनियर्स’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसली होती.





