मुंबई : मुंबई क्राइम ब्रांचच्या सायबर सेलने प्रसिद्ध कॉमेडियन सागर कारंडे (Sagar Karande) यांच्यासोबत झालेल्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणात अक्षय कुमार गोपालन या आरोपीला ठाण्यातून अटक केली आहे. सागर (Sagar Karande) यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांना व्हॉट्सएपवर एक लिंक प्राप्त झाली. ज्यात लिंक पाठवल्यास 150 कोटी रुपये मिळतील, असे आमिष दाखवण्यात आले. यावर विश्वास ठेवून सागर यांनी संबंधित इंस्टाग्राम पोस्ट लाइक करण्यास सुरुवात केली. सायबर गुन्हेगारांनी विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना सुरुवातीला 11 हजार रुपये दिले. 27 लाखांची गुंतवणूक, पण परतावा नाही सायबर गुन्हेगारांनी अधिक कमाईचे आमिष दाखवत सागर यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार, सागर यांनी 27 लाख रुपये गुंतवले. काही काळानंतर त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. गुन्हेगारांनी 80 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करत, अधिक गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगितले. हे पण वाचा : ‘भरत-सिद्धार्थ’ची जोडी एकत्र; आता थांबायचं नाय! चित्रपटाच्या ट्रेलरने उत्सुकता वाढवली! क्रिप्टोद्वारे पैसे लंपास यानंतर सागर यांनी आणखी 19 लाख रुपये आणि 30 टक्के करासह एकूण 61 लाख 83 हजार रुपये गुंतवले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस तपासात अक्षयने सागर यांच्या गुंतवणुकीतील 4 लाख 59 हजार रुपये आपल्या मित्राच्या खात्याद्वारे काढल्याचे उघड झाले. या रकमेचा उपयोग त्याने आंतरराष्ट्रीय बाजारात क्रिप्टोकरन्सीच्या खरेदी-विक्रीसाठी केला. आरोपी आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगार पोलिस तपासात अक्षय हा यापूर्वीही अशा फसवणुकीच्या प्रकरणात सहभागी असल्याचे आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. ठाणे उत्तर विभाग सायबर पोलिस या प्रकरणाचा (Sagar Karande) पुढील तपास करत आहेत.