मनोज वाजपेयी येताच ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर अवतरला भिकू म्हात्रे अन् सुरु झाली धमाल… VIDEO

मुंबई – बॉलिवूडमधील भिकू म्हात्रे अर्थात मनोज वाजपेयी एक उत्तम कलाकार आहे. ‘सिर्फ एक बंदा काफी है’ नावाचा मनोज वाजपेयीचा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मनोज वाजपेयी लवकरच मराठी कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’मध्ये हजेरी लावणार आहे. याचा एक भन्नाट प्रोमो देखील सध्या व्हायरल होतोय.
मनोज वाजपेयी आपल्या प्रत्येक चित्रपटातून काहीतरी वेगळं घेऊन येत असतो. आताही मनोज पहिल्यांदाच एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मनोजने चला हवा येऊ द्यामध्ये हजेरी लावली. याचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. ज्यामध्ये कॉमेडी स्टार भाऊ कदम भिकू म्हात्रे तर कुशल बद्रिके सयाजी शिंदे झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हवा येऊ द्याच्या सेटवर कॉमेडी स्टारसोबत मनोज वाजपेयी धमाल उडवून देताना दिसत आहे. यावेळी सयाजी झालेला कुशल भिकू बनलेल्या भाऊला ‘मनात हसून दाखव’ असं विचारतोय. थुकरटवाडीतील कलाकारांच्या विनोदाने मनोज बाजपेयी देखील खळखळून हसणार आहे. 29 मे रोजी हा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
सिर्फ एक बंदा काफी है या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही काळ चित्रपटाबाबत वाद देखील निर्माण झाला होता. एका धार्मिक बाबावर एक अल्पवयीन मुलगी लैगिक छळाचा आरोप करते आणि एक वकील तिची न्यायालयात केस लढण्यासाठी मदत करत असतो. ट्रेलरवरून असे कथानक या चित्रपटाचे असल्याचे समजते. मनोज वाजपेयीने या चित्रपटात दर्जेदार अभिनय केला आहे.





