चंदीगड – विद्यार्थ्यांना ब्रम्ह मुहुर्तावर म्हणजे पहाटे साडे चारच्या सुमाराला अभ्यासासाठी जागवण्यासाठी प्रत्येक गावागावातील मंदिर, मशिद व गुरूद्वारांतील लाऊडस्पीकर्स द्वारे मुलांना उठवले जावे असे एक अजब तुघलकी फर्मान हरियाणा सरकारने जारी केले आहे. त्यावर संतप्त प्रतिक्रीया येऊ लागली आहे.
10 वी 12 वीच्या परिक्षा जवळ येत असल्याने त्या विद्यार्थ्यांना जागवण्यासाठी या लाऊडस्पीकर्सचा वापर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. परंतु या आदेशाने केवळ विद्यार्थिच नव्हे तर अन्य लोकांनाहीं त्रास होणार असून त्यांची झोपमोड होणार आहे. तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी 7 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्यास मनाई आहे या आदेशाचाही यातून भंग होत आहे. तथापि हरियाणाच्या सरकारने मात्र आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
Tripura : भाजपाला धक्का, सातव्या आमदाराने सत्ताधारी आघाडीला ठोकला रामराम
राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांचे सहा ते सात आठवडे आधीच वाया गेले असून त्यांच्या महत्वाच्या परिक्षा जवळ आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पहाटेच्यावेळी विद्यार्थी उठल्यानंतर त्यांचा अभ्यास चांगला होऊ शकतो. त्यावेळी वातावरणही शांत असते असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. 22 डिसेंबर रोजी हा आदेश काढण्यात आला आहे. त्यात प्रत्येक गावातील पंचायत सदस्यांनाही सहभागी होऊन विद्यार्थ्यांना पहाटेच्यावेळी जागे करण्याची सूचना केली आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांना आणि मुख्याध्यापकांनाही राज्य सरकारने आदेश जारी केले आहेत.
Ratan Tata : रतन टाटा यांना भारतरत्नने सन्मानित करावे – खासदार रामकृष्ण राजू
प्रत्येक शिक्षकांनी व्हॉटसऍपद्वारे आपआपल्या भागातील विद्यार्थी व पालकांशी संपर्क स्थापन करून ते उठले आहेत की नाही याची खात्री करावी. जर विद्यार्थी दाद देत नसतील तर त्यांची नावे शाळा व्यवस्थापन समितीच्या निदर्शनाला आणण्याची सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आली आहे. या अजब प्रकाराविरोधात आता आवाज उठू लागला आहे.