ट्रॅफिकमध्ये अडकली अन् जीव वाचला; थरारक अनुभव सांगत महिला म्हणाली, “गणपती बाप्पामुळे वाचले…”

Ahmedabad Plane Crash | गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या AI-171 या विमानाच्या अपघातात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र या अपघातादरम्यान, देव तारी त्याला कोण मारी ही म्हण खरी ठरली आहे. एका महिलेचे नशीब बलवत्तर होते म्हणून अहमदाबादच्या वाहतूक कोंडीत ही महिला अडकली आणि तिचा जीव वाचला.
त्याच झालं असं की, भूमि चौहान या अहमदाबादवरून लंडनला परत निघाल्या होत्या. पण प्रचंड वाहतूक कोंडीमुळे विमानतळावर पोहचण्यासाठी त्यांना १० मिनिटं उशिर झाला. त्यामुळे फ्लाइट AI-171 मध्ये चढण्याची परवानगी मिळाली नाही. या उशिरामुळे त्यांचा जीव वाचला.
याबाबत भूमि चौहान यांनी सांगितले की, “या घटनेची माहिती मिळाल्यावर मन सुन्न झाले. मी गणपती बाप्पाची आभारी आहे. त्यांनी मला वाचवले. 10 मिनिटांच्या उशिरामुळे मी त्या विमानात चढू शकले नाही. हे अनुभव शब्दांत मांडणे अशक्य आहे.” दरम्यान, या दुर्दैवी घटनेमधून भूमि चौहान यांचा चमत्कारिकपणे जीव वाचला. Ahmedabad Plane Crash |
भूमि चौहान दोन वर्षांनंतर भारतात आल्या होत्या. त्या एकट्याच लंडनला परतत निघाल्या होत्या. भूमी लंडनमधील ब्रिस्टल येथे आपल्या पतीसोबत राहतात आणि त्या सुट्ट्यांसाठी भारतात आल्या होत्या. त्यांचे पती सध्या ब्रिटनमध्येच आहेत. फक्त 10 मिनिटांच्या उशिरामुळे त्या प्रवास करू शकल्या नाही आणि त्यांचा जीव वाचला. Ahmedabad Plane Crash |
भीषण दुर्घटनेत एकमेव प्रवासी बचावला
दरम्यान, या भीषण दुर्घटनेत एकमेव प्रवासी, विश्वशकुमार रमेश (सीट 11A), सुदैवाने बचावला. या भीषण अपघातात 242 प्रवाशांपैकी फक्त एकच जण जिवंत आढळला आहे. रमेश विश्वासकुमार अपघातातून बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रमेश विश्वासकुमार यांना दुखापत झाली असली तरी ते अगदी चालत रुग्णवाहिकेपर्यंत गेले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Ahmedabad Plane Crash |
हेही वाचा:
“…पण सरकारने आता तरी गांभीर्य दाखवायला हवं”; विमान दुर्घटनेनंतर राज ठाकरेंनी उपस्थित केली शंका





