“…पण सरकारने आता तरी गांभीर्य दाखवायला हवं”; विमान दुर्घटनेनंतर राज ठाकरेंनी उपस्थित केली शंका

Raj Thackeray | अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या AI171 विमानाचा गुरुवारी भीषण अपघात झाला. टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांत विमान विमानतळाच्या हद्देबाहेर कोसळले. एअर इंडियाच्या विमानाच्या या भीषण अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर विमान ज्या भागात कोसळलं त्या भागातील २४ जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. या विमान अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक ट्वीट शेअर करत बोईंगच्या ड्रीमलाईनरबद्दल अनेक तक्रारी होत्या, त्याबाबत काही सवाल उपस्थित केले आहेत.
राज ठाकरेंची पोस्ट
अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुःखद घटना आहे. या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. तसंच जखमी लवकरात लवकर बरे होऊ देत आणि सुखरूप घरी जाऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
विमान तंत्रज्ञानाबद्दल जरी मला खूप खोल माहिती नसली तरी माझ्या वाचनात काही गोष्टी याच्या आधी पण आल्या होत्या, त्यातून मला काही प्रश्न पडले. बोईंगच्या ‘ड्रीमलाईनर’ विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या. २०१३ ला पहिल्यांदा जपान एअरलाईन्सच्या विमानाला आग लागली होती. त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या. त्या इतक्या होत्या की २०२० ते २०२३ या काळात अनेकदा या विमानांच उड्डाण थांबवलं गेलं होतं. जानेवारी २०१३ ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास ३ महिने बोईंग ड्रीमलाईनरचं उड्डाण खंडित केलं होतं. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे २०१३ ला भारतात डीजीसीएने देखील काही काळासाठी या विमानाचं उड्डाण खंडित केलं होतं. Raj Thackeray |
जर ड्रीमलाईनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहित असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो ? डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली ? आजच्या विमान अपघाताविषयी वाचताना अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे हे विमान २८ जानेवारी २०१४ ला एअर इंडियाच्या सेवेत आलं. थोडक्यात जगभरात जेव्हा ड्रीमलाईनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं. Raj Thackeray |
अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुःखद घटना आहे. या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. तसंच जखमी लवकरात लवकर बरे होऊ देत आणि…
— Raj Thackeray (@RajThackeray) June 12, 2025
ड्रीमलाईनरची सेवा २०२० ते २०२३ च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याचा इतिहास असताना, एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी ४० हुन अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर दिली… आणि या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली ? डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला ?
ही वेळ हे सगळं बोलण्याची नाही असं म्हणलं जाईल. जी घटना घडली ती दुःखद आहे पण म्हणून या विषयावर सरकारने आता तरी गांभीर्य दाखवायलाच हवं. ड्रीमलाईनर्स जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर कुठलाही दबाव न सहन करता याची सेवा खंडित करावी आणि वेळेस आधीची ऑर्डर रद्द करावी, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
पुरावे केले सादर
याशिवाय राज ड्रीमलायनरबद्दलच्या काही युट्युब लिंक देखील शेअर केल्या आहेत. ज्यात त्यांनी म्हंटले आहे की, मी जे सगळं मांडलं आहे त्या विषयी न्यूयॉर्क टाइम्स, वॉलस्ट्रीट जर्नल, अल-जझीरा यामध्ये छापून आलं आहे. अल-जझीराने तर ड्रीमलायनरबद्दल एक डॉक्युमेंट्री पण केली आहे त्याची युट्युब लिंक पण सोबत दिली आहे. ज्यांना हा सगळा विषय खोलात समजून घ्यायची इच्छा असेल त्यांनी जरूर हे वाचा, जमल्यास डॉक्युमेंट्री पण बघा.
https://en.wikipedia.org/wiki/2013_Boeing_787_Dreamliner_grounding?utm_source=chatgpt.com
https://pbssocal.org/shows/frontline/clip/boeings-fatal-flaw-xenaq0?utm_source=chatgpt.com
https://en.wikipedia.org/wiki/Boeing_787_Dreamliner?utm_source=chatgpt.com
https://wsj.com/business/airlines/boeings-quality-complaints-mount-as-another-whistleblower-comes-forward-396db79b?utm_source=chatgpt.com
न्यूयॉर्क टाइम्सच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही खालील शब्द टाकलेत तर तुम्हाला संपूर्ण आर्टिकल वाचता येईल.
https://nytimes.com Report on Boeing 787 Dreamliner Batteries Assigns Some Blame for Flaws” by Jad Mouawad (published December 1, 2014)
वॉलस्ट्रीट जर्नलच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जर हे शब्द टाकलेत तर तुम्हाला याबद्दल पूर्ण वाचता येईल.
https://wsj.com Production Problems Spur Broad FAA Review of Boeing Dreamliner Lapses WSJ, असे म्हणत राज ठाकरे यांनी बोईंगच्या ड्रीमलाईनरच्या विमानसेवेबाबत अनेक पुरावा सादर केले आहेत. Raj Thackeray |
हेही वाचा:
जिद्दीने स्वप्न केलं पूर्ण, नियतीने हिरावून घेतलं; डोंबिवलीकर क्रू मेंबर रोशनीचा विमान दुर्घटनेत अंत





