Commonwealth Games 2030 : भारताला 15 वर्षांनंतर ‘राष्ट्रकुल’चे यजमानपद! ‘या’ शहरात पार पडणार संपूर्ण स्पर्धा

India host Commonwealth Games 2030 at Ahmedabad : भारताला 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद मिळाले आहे. बुधवारी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर अहमदाबादला यजमान शहर म्हणून घोषित करण्यात आले. भारत 15 वर्षांनंतर या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. यापूर्वी 2010 मध्ये नवी दिल्लीत या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भारतीय खेळाडूंनी 38 सुवर्ण पदकांसह एकूण 101 पदके जिंकली होती.
हे पहिल्यांदाच घडेल जेव्हा कोणताही मोठा आंतरराष्ट्रीय मल्टी-स्पोर्ट्स इव्हेंट दिल्लीबाहेर आयोजित केला जाईल. यापूर्वी भारताने 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, 1951 आणि 1982 च्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे यजमानपदही भूषवले आहे. हे तिन्ही मोठे मल्टी-स्पोर्ट्स इव्हेंट दिल्लीत झाले होते. राष्ट्रकुल संघाने दोनदा गुजरातचा दौरा केला आहे, जिथे त्यांनी अहमदाबादच्या पायाभूत सुविधा आणि तयारीची पाहणी केली. केंद्र सरकारने 2030 च्या स्पर्धांसाठी बोली लावण्यास मंजुरी दिली.
अहमदाबादमध्ये प्रेक्षकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा –
Congratulations to every citizen as India wins the prestigious bid to host the 2030 Commonwealth Games in Ahmedabad.
This is a testament to PM Shri @narendramodi Ji’s vision for turning our Bharat into a global sports hotspot. Through penance spanning over a decade, Modi Ji has…
— Amit Shah (@AmitShah) November 26, 2025
29 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हर्ष संघवी, पीटी उषा आणि इतर अधिकाऱ्यांनी लंडनमध्ये अधिकृत बोली सादर केली. बोलीमध्ये अहमदाबादला एक आधुनिक, कॉम्पॅक्ट आणि उच्च-मानक क्रीडा शहर म्हणून सादर केले आहे. खेळाडू, अधिकारी आणि प्रेक्षकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. मुख्य ठिकाणे म्हणून नरेंद्र मोदी स्टेडियम, नारणपुरा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह प्रस्तावित करण्यात आले आहेत.
हेही वाचा – Mohammed Siraj : ‘बस करा!’ चाहत्यांच्या घोषणाबाजीवर संतापला सिराज; गौतम गंभीरसाठी राहिला उभा, पाहा VIDEO
ऑलिम्पिक 2036 ची दावेदारी मजबूत होईल –
#Watch | From 2010 to 2030, India returns to the #CommonwealthGames stage with unmatched ambition.
The centenary edition on Indian soil will inspire millions and ignite the dreams of future champions. #CWG2030InBHARAT @YASMinistry @Media_SAI@mansukhmandviya @MIB_India pic.twitter.com/1uMrI3Uwh4
— DD News (@DDNewslive) November 26, 2025
कॉमनवेल्थ गेम्स 2030 यजमानपदामुळे ऑलिम्पिक गेम्स 2036 च्या यजमानपदासाठी भारताची दावेदारी मजबूत होईल. भारत 2036 च्या ऑलिम्पिक गेम्सच्या यजमानपदाची तयारीही करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून याची घोषणा केली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारताने ऑलिम्पिक गेम्स 2036 चे यजमानपद मिळवण्यासाठी दावेदारी सादर केली होती.





