IND vs NZ Final : काशीत हवन, अहमदाबादमध्ये रण! टीम इंडियाच्या विजयासाठी अस्सी घाटावर साकडं
IND vs NZ Final : वाराणसीच्या प्रसिद्ध अस्सी घाटावर हातात तिरंगा घेऊन क्रिकेट चाहत्यांनी विशेष हवन आणि पूजन केले.

Kashi Cricket fans perform havan IND vs NZ Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२६ च्या विजेतेपदाच्या लढतीसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. भारताच्या विजयासाठी धर्मनगरी काशीमध्ये क्रिकेट प्रेमींनी अनोखी श्रद्धा दाखवली आहे. वाराणसीच्या प्रसिद्ध अस्सी घाटावर हातात तिरंगा घेऊन क्रिकेट चाहत्यांनी विशेष हवन आणि पूजन केले. “भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी करून विश्वचषक घरी आणावा,” अशी भावना यावेळी चाहत्यांनी व्यक्त केली.
चाहत्यांचा विश्वास: ‘आमचे खेळाडू फॉर्मात आहेत’
एका चाहत्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना दैवी आशीर्वाद मिळावा म्हणून आम्ही हे हवन केले आहे.” केवळ काशीच नाही, तर संपूर्ण भारतात विजयासाठी प्रार्थना आणि देव पाण्यात घालून बसले आहेत.
T20 वर्ल्ड कप 2026 के फाइनल से पहले आस्था का माहौल@T20WorldCup #India #NewZealand #Kashi #Updateindia pic.twitter.com/xCOVRFgPJy
— Update India (@UpdateIndia_TV) March 8, 2026
हवामान अहवाल: अहमदाबादमध्ये पावसाचे सावट नाही!
ट्रंप की जीत से लेकर भारत की क्रिकेट टीम की जीत तक।
कैमरे के चक्कर में इनको लगातार आहुति देती रहनी पड़ती है। #INDvsNZ #T20WorldCup pic.twitter.com/YVBTGJ6RgZ
— Mukesh Mathur (@mukesh1275) March 8, 2026
‘एक्यूवेदर’च्या ताज्या अहवालानुसार, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या जेतेपदाच्या सामन्यात पावसाची शक्यता नगण्य आहे. दिवसभर हवामान स्वच्छ राहण्याची चिन्हे आहेत. सामन्यादरम्यान कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दोन्ही संघांचे ‘योद्धे’ सज्ज –
भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव.
न्यूझीलंड संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, टिम सेफर्ट, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, कोल मॅककॉन्ची, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, डेव्हॉन कॉनवे, काईल जेमिसन, ईश सोधी, जॅकब डफी.





