Satara | ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ मायणीत कडकडीत बंद

मायणी, (प्रतिनिधी) – मायणी येथील दीपक देशमुख यांच्या रावर ईडीने धाड घालून त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत मानसिक त्रास दिला. त्याच्या निषेधार्थ व देशमुख कुटुंबीयांना पाठिंबा देण्यासाठी शनिवारी मायणीतील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला.
मायणी येथील मेडिकल कॉलेजचे गैरव्यवहार प्रकरणी ईडीने चौकशीसाठी या संस्थेचे संस्थापक डॉ. एम आर देशमुख व त्यांचे बंधू आप्पासाहेब देशमुख यांना कैदेत ठेवले आहे. या संस्थेचे माजी उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी कोरोना काळात आमदार जयकुमार गोरे व सहकारी यांनी शासनाची फसवणूक करून शासनाचे आर्थिक भ्रष्टाचार केल्याबद्दल हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती.
येत्या 12 ऑगस्ट रोजी यावर न्यायालयात निकाल दिला जाणार असून देशमुख कुटुंबीयांवर दडपण आणव्याच्या भावनेने सदर ईडीची तपासणी लावल्याच्या भावना सर्वत्र व्यक्त केल्या जात आहेत.
देशमुख यांच्या घरात इडीचे अधिकारी शिरल्यानंतर त्यांनी जे संतापजनक वर्तन केले त्यामुळे अनेकांची मने हेलावली. सकाळी सात वाजता ईडीचे अधिकारी घरात शिरल्यानंतर त्यांनी सर्वांना एकत्र बोलावून एका ठिकाणी बसवून ठेवले ते संध्याकाळपर्यंत हलू दिले नाही. सकाळी सातच्या आत काहीजण उठावयाचे होते.
काही महिला स्नान करून कपडे बदलून येत असताना त्यांना कपडे बदलण्यास सुद्धा वेळ दिला नाही, त्यांना स्वयंपाक देखील करू न दिल्याने घरातील सर्वजण दिवसभर उपाशीच राहिले, दोन-तीन वर्षांची लहान मुले रडत असताना देखील त्यांना दूध देऊ दिले नाही, लहान मुलांकडून चॉकलेट देतो पप्पा कुठे गेले आहेत.
अशा प्रकारच्या लालूच दाखवून माहिती काढण्याचा प्रयत्न केला व महिलांच्या मागे कोविड काळातील कागदपत्रे देण्याबद्दल सारखा तगादा लावला होता. काही महिलांना शुगरचा बीपीचा त्रास असल्यामुळे त्यांना गोळ्या घेण्यासाठी देखील जेवण करु न क्रूर वागणूक ईडीच्या अधिकाऱ्यांकडून दिली गेली .
निषेध सभेमध्ये माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख म्हणाले ,ईडीने तपासाची चुकीची पद्धत वापरली .त्याचप्रमाणे माता- भगिनींना प्रचंड मानसिक त्रास दिला .कालची कारवाई ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शोभणारी नाही. गोरगरिबांनी दिलेल्या कराच्या रकमेतून कोरोना काळात लाखो रुपये लुबाडून लोकप्रतिनिधींनी शासनाची फसवणूक केल्यामुळेच न्यायालयाने याची गंभीर देखील घेतली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणाले, देशमुख कुटुंबीयांवर गेले दोन-तीन वर्षांपासून अशा प्रकारचे सातत्याने आघात होत आहेत. मात्र, देशमुख कुटुंबियांनी अशा परिस्थितीत निर्भीडपणे या सर्व प्रसंगांना तोंड दिले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात गोरे सरकारच्या कारकिर्दीत जेवढा अन्याय झाला नाही तेवढा निंदनीय प्रकार ईडीच्या कारवाईतून झाला आहे. या पुढील काळात देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी माणखटाव तालुक्यातील जनतेने देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी नंदकुमार मोरे, डॉ.विकास देशमुख ,अनिल पवार ,विजय शिंदे ,राजकुमार यादव, डॉ. महेश गुरव, जयवंत खराडे ,विकास सकट यांनी तीव्र निषेध केला.





