Satara | महाविकास आघाडीचं मिटतंय का बघा – बाळासाहेब आटपाडकर

वरकुटे मलवडी, (प्रतिनिधी) – महायुतीचे उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांना तिकीट जाहीर झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडुन अजूनपर्यंत कोणाचे नाव जाहीर झाले नाही.
महाविकास आघाडीकडून अनेक पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत कोणाला तिकीट जाहीर करायचे असा प्रश्न नेत्यांच्या पुढे पडलेला पहायला मिळताना दिसत आहे.
महाविकास आघाडीकडुन उमेदवार जाहीर होत नसल्याने माण तालुका महाविकास आघाडीचं मिटतय का बघा नाहीतर, पहिला आमचा जयकुमार गोरे बरा, अशी भावना काँग्रेसचे नेते बाळासाहेब आटपाडकर दै. प्रभातशी बोलताना व्यक्त केली.
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशीच मुख्य लढत होणार आहे. दोन पक्षांच्या युतीत जागा वाटपाचा प्रश्न निर्माण झालेला आपल्याला दिसत आहे.
प्रत्येक पक्ष आपणाला जास्त जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत.त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात जागा वाटपाचा तिढा निर्माण होत आहे.
महाविकास आघाडीकडून अनेक पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत कोणाला तिकीट जाहीर करायचे असा प्रश्न नेत्यांच्या पुढे पडलेला पहायला मिळताना दिसत आहे.
काँग्रेस पार्टीकडून रणजितसिंह देशमुख, ठाकरे गटाकडून शेखर गोरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अनिल देसाई, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, अभय जगताप यांच्या नावाची चर्चा आहेत.
परंतु, या सहा उमेदवारांपैकी एका उमेदवारची निवड करायची असल्याने प्रत्येक पक्षात तेढ निर्माण झालेला पहायला मिळताना दिसत आहे.
माण खटाव मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव निश्चित झाले नसल्याने मतदारराजा नाराज झालेला पहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला तरी प्रत्येक उमेदवाराचे वेगवेगळे गटतट आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी गटतट बाजूला ठेवून काम केले तरच पुढील असणारा उमेदवाराचा पराभव होवू शकतो.
परंतु मागील तीन निवडणुकीला असे झाले नसल्याने महविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने उमेदवारीचा निर्णय लवकर जाहीर करण्याची गरज आटपाडकर यांनी व्यक्त केली आहे.




