Satara | ज्यांनी तालुक्यात टेंभूचे पाणी आणले त्यांच्या पाठीशी उभे रहा

कलेढोण (वार्ताहर) – ज्यांनी खटाव माण तालुक्यात टेंभूचे पाणी आणले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे उद्गार आमदार जयकुमार गोरे यांनी विखळे येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना काढले.
याप्रसंगी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, विकल्प शहा, वडूज मार्केट कमिटीचे संचालक अभिजित देशमुख, सुरेशअण्णा देशमुख,रघुनाथराव घाडगे,पोपटराव गारळे, कलेढोणचे सरपंच सौ. प्रिती शेटे, सुहास शेटे,
ग्रामपंचायत सदस्य बरकत शिकलगार, जालिंदर बुधावले, राजेंद्र कणसे, रफिक मुलाणी,सयाजीराव पाटील, दिपक खताळ,मोहनराव दगडे, सोमनाथ भोसले,विशाल बागल,सूरज पाटील तसेच कलेढोण गणातील सर्व गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ.दिलीपराव येळगावकर म्हणाले, शेवटच्या श्वासापर्यंत मी आमदार जयकुमार गोरे यांची साथ सोडणार नाही. या निवडणुकीत आ.गोरे यांना प्रचंड मतानी निवडून द्यायचे आहे. हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायचे आहे.
सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी आमदार जयकुमार गोरे यांचा विधानसभा उमेदवारीचा अर्ज दहिवडी येथे भरावयाचा आहे, यादिवशी सर्वांनी सकाळी १० वाजता दहिवडी येथे जमायचे आहे असे सांगितले.
टेंभू पाण्याच्या विखळे येथील भूमिपूजन समारंभ प्रसंगीच टेंभू योजनेच्या पाईप जवळ जवळ ४० गावात पोहोचल्या. हे काम अत्यंत वेगाने सुरु आहे.
खटाव माण तालुक्यातील ४२ गावांना पाणी मिळाल्याशिवाय उमेदवारीचा अर्ज भरणार नाही अशी प्रतिज्ञा आपण केली होती. ४२ गावांना टेंभूचे पाणी देण्याचे वचन आपण पूर्ण केले आहे,खटाव तालुक्याचा दुष्काळी हा कलंक यापुढे राहणार नाही.
लाडक्या बहिणींचा कार्यक्रम अप्रतिमरित्या पार पडला.असे सांगून ते म्हणाले ही निवडणूक न भूतो न भविष्यति अशी आहे.
माझ्या नादाला लागू नका मी नादच पुरा करेन, ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना मी वाचवले,त्यांनी उपकाराची जान ठेवावी, असा टोला प्रभाकर घार्गे यांचे नाव न घेता लगावला. यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी कोणत्या गावातून किती लोक येणार याचा आढावा घेतला.





