Chandrashekhar Bawankule : OYO रूमबाबत नियम आणखी कडक होणार? चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे संकेत
Chandrashekhar Bawankule : राज्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या OYO हॉटेल आणि रूम बुकिंग सेवांबाबत नियम आणखी कडक करण्याचे संकेत राज्याचे मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

Chandrashekhar Bawankule : राज्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या OYO हॉटेल आणि रूम बुकिंग सेवांबाबत नियम आणखी कडक करण्याचे संकेत राज्याचे मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. नागपूर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी OYO हॉटेल्ससाठी तयार केलेल्या नियमावलीचे बावनकुळे यांनी कौतुक केले. (Chandrashekhar Bawankule)
OYO रूमच्या माध्यमातून येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवण्यासह हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याबाबत कठोर नियम करण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. OYO हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांचा रेकॉर्ड ठेवणे आणि ९० दिवसांचे सीसीटीव्ही चित्रीकरण जतन करणे बंधनकारक असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. (Chandrashekhar Bawankule)
‘OYO वर पोलिसांची करडी नजर असेल’
याबाबत आपली पोलिस आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून, हा विषय गांभीर्याने घेण्यात आला आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. विश्वास नांगरे पाटील यांनी यासाठी चांगली नियमावली तयार केली असून, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)
नागपूरमध्ये अनेक हॉटेल्सवर OYOचे बोर्ड दिसतात. हे बोर्ड नेमके कशासाठी लावण्यात आले आहेत, याचीही तपासणी करण्याची गरज असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. त्यामुळे OYO हॉटेल्सवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
नागपूरची सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा बिघडणार नाही, याची काळजी घेण्यासाठी पोलिस आयुक्तांनी पावले उचलली असल्याचे सांगत बावनकुळे यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्या भूमिकेचे समर्थन केले. (Chandrashekhar Bawankule)
दरम्यान, नागपूरमध्ये लागू करण्यात येणारी ही नियमावली भविष्यात राज्यभरातील OYO रूम आणि हॉटेल बुकिंग सेवांना लागू केली जाणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. (Chandrashekhar Bawankule)
मनोज जरांगेंच्या आंदोलनावरही बावनकुळेंची प्रतिक्रिया
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाबाबतही चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले. सध्याच्या परिस्थितीत मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात, यापेक्षा राज्यातील दुष्काळाची परिस्थिती अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले. (Chandrashekhar Bawankule)
मुंबईतील आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत त्यांनी आंदोलकांना मुंबईत आंदोलन न करण्याचे आवाहन केले. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे बावनकुळे म्हणाले.
तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली जाणारी टीका महाराष्ट्रातील जनता आणि समाजाला मान्य नसल्याचेही त्यांनी म्हटले. (Chandrashekhar Bawankule)
Chandrashekhar Bawankule : ओयोबाबतचे नियम आणखी कडक करणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत





