Accident News : नागपुरात दूचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू
Accident News : नागपूर शहरातील सदर उड्डाणपुलावर शुक्रवारी रात्री उशिरा एक भीषण आणि अत्यंत दुर्दैवी अपघात घडला.

Accident News : नागपुरात स्पोर्ट्स बाईक उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीवर आदळल्याने एका अल्पवयीन मुलासह दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा शहरातील सदर उड्डाणपुलावर घडली. (Accident News)
मृत व्यक्तींची ओळख समीर मोहम्मद शाकीर शेख (२२) आणि ऐफाज मोहम्मद जाहिद अन्सारी (१५) अशी पटली आहे. हे दोघेही यशोधरा नगरमधील शिवाजीनगर भागातील रहिवासी होते. (Accident News)
पोलिसांच्या माहितीनुसार, समीरने आपल्या मेव्हण्याची स्पोर्ट्स बाईक चालवण्यासाठी घेतली होती. एलआयसी चौकातून यशोधरा नगरकडे परतत असताना समीरचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ती गुरुद्वारानजीकच्या संरक्षक भिंतीवर आदळली. (Accident News)
त्यानंतर दुचाकीस्वार सुमारे २५ फूट फरफटत गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. पोलिसांचे गस्त पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मोबाईलद्वारे त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. (Accident News)
दोघांनाही तातडीने मेयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. (Accident News)
Accident News : भंडाऱ्यात भीषण अपघात; ट्रक-एसयूव्हीच्या धडकेत तीन मुलांसह 8 जणांचा जागीच मृत्यू
Accident News : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, चार जण जखमी





