Manoj Jarange : मनोज जरांगेंची घोषणा अन् तासाभरातच मोठा धक्का; मराठ्यांमध्ये फूट; मुंबईतील आंदोलनाला विरोध
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली असली, तरी तासाभरातच मराठा आंदोलकांत मोठी फूट पडल्याचे समोर आले आहे.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्या या आंदोलनाला सुरुवातीलाच राज्यातील काही मराठा समन्वयकांचा विरोध होताना दिसत आहे. (Manoj Jarange)
गेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी यावेळी जरांगे पाटील यांच्या आंदोलनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. (Manoj Jarange)
गेल्या आंदोलनावेळी नाशिकमधील समन्वयकांनी मुंबईतील आंदोलकांसाठी मोठ्या प्रमाणात रसद उपलब्ध करून दिली होती. हजारो आंदोलकांसाठी जेवण, पाणी आणि किराणा सामानाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, यावेळी आंदोलनात सहभागी न होण्याची भूमिका समन्वयकांनी घेतल्याने जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. (Manoj Jarange)
मागण्यांमध्ये स्पष्टता नसल्याचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांमध्ये पुरेशी स्पष्टता नाही, अशी भूमिका नाशिकमधील समन्वयकांनी घेतली आहे. मागण्या नेमक्या कशा पूर्ण होणार आणि त्या कायदेशीरदृष्ट्या कशा टिकणार, याबाबत स्पष्ट स्पष्टीकरण मिळेपर्यंत आंदोलनात सहभागी होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. (Manoj Jarange)
तसेच, जरांगे यांच्यासोबत असलेले कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासक यांचा सल्लाही पुरेशा प्रमाणात ऐकला जात नसल्याचा आरोप समन्वयकांनी केला आहे. त्यामुळे आंदोलनाची दिशा भरकटत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (Manoj Jarange)
‘गेल्यावेळी फक्त आश्वासनं मिळाली’
गेल्या आंदोलनात कोणतीही ठोस पूर्वतयारी आणि नियोजन नसतानाही मुंबईकडे गेलो. आंदोलनातून परतल्यानंतर जल्लोषही करण्यात आला. मात्र, अखेरीस सरकारच्या आश्वासनांमुळे मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली, अशी नाराजी नाशिकच्या समन्वयकांनी व्यक्त केली. (Manoj Jarange)
गेल्या वेळी स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून आंदोलकांसाठी रसद पुरवली. मात्र, आता वेगळी भूमिका घेतल्यामुळे जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर वैयक्तिक टीका केली जात असल्याची खंतही समन्वयकांनी व्यक्त केली. (Manoj Jarange)
सरकारकडून वारंवार फसवणूक होत असल्याचा आरोप होत असताना आणि आंदोलनाची दिशा स्पष्ट नसताना पुन्हा मुंबईला जाण्यात काय अर्थ आहे, असा सवाल करत नाशिकमधील समन्वयकांनी यावेळी आंदोलनापासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. (Manoj Jarange)
जरांगेंचा मुंबईकडे जाण्याचा मार्ग काय?
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी मुंबई आंदोलनाची घोषणा केली. मुंबईच्या प्रवासादरम्यान चार ठिकाणी मुक्काम करण्यात येणार असून पाचव्या दिवशी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. (Manoj Jarange)
जरांगे पाटील यांच्या नियोजनानुसार पाटोदा (बीड), श्रीगोंदा (अहिल्यानगर), हडपसर (पुणे) आणि खोपोली किंवा कोपरखैरणे (रायगड) येथे मुक्काम करण्यात येणार आहे. त्यानंतर पाचव्या दिवशी सकाळी १० वाजता मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. (Manoj Jarange)
आंदोलनादरम्यान न्यायदेवतेचा सन्मान राखावा आणि संपूर्ण आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. मात्र, नाशिकमधील समन्वयकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आगामी मुंबई आंदोलनात अंतर्गत मतभेदांचा मुद्दा चर्चेत आला आहे. (Manoj Jarange)
Manoj Jarange : “सरकारची परवानगी असो वा नसो, मुंबईकडे कूच करणारच” – मनोज जरांगे






