संसद अधिवेशनात महागाई, अग्निपथवरून कॉंग्रेस मोदी सरकारला घेरणार

नवी दिल्ली – कॉंग्रेसने गुरूवारी संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी रणनीती निश्चित केली. त्यानुसार, महागाई, अग्निपथ योजना, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरण्यासाठी कॉंग्रेस पक्ष सज्ज झाला आहे.
संसदेचे अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होईल. त्या पार्श्वभूमीवर, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची येथे बैठक झाली. त्या बैठकीत अधिवेशनात कुठले मुद्दे प्रामुख्याने मांडायचे यावर चर्चा झाली. देशाची आर्थिक स्थिती, रूपयाचे घटते मूल्य, शेतकऱ्यांच्या मागण्या हे मुद्देही कॉंग्रेस अधिवेशनात लावून धरणार आहे.
ग्लोबल टीचर डिसले गुरुजी यांचा पाय खोलात; गैरहजर प्रकरण भोवणार
त्याशिवाय, चीनी कुरापतींवर संसदेत चर्चेची मागणी पक्षाकडून केली जाणार आहे. बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे, पी.चिदंबरम, जयराम रमेश, अधिररंजन चौधरी हे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. सध्या परदेश दौऱ्यावर असणारे पक्षाचे नेते राहुल गांधी हे अधिवेशन सुरू होण्याआधी मायदेशी परतणार असल्याचे समजते. संसदेचे अधिवेशन 12 ऑगस्टला समाप्त होईल. त्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून सामना रंगताना दिसेल.
“अतिवृष्टीमुळे जनता हैराण; नवीन सरकार मात्र मंत्रीमंडळ विस्तारातच व्यस्त”





