Wagholi News : वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी पालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा
शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने (Wagholi News) धडक मोहीम हाती घेतली आहे.

Wagholi News : शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने (Wagholi News) धडक मोहीम हाती घेतली आहे. शनिवारी (दि.२१) वाघोलीतील बकोरी रोड आणि आयव्ही इस्टेट परिसरात कारवाई केल्यानंतर रविवारी (दि.२२) सलग दुसऱ्या दिवशी केसनंद रोड परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली.
महापालिकेने फौजफाट्यासह कारवाई करत अनधिकृत पथारी, हातगाड्या, व्यावसायिक शेड्स तसेच फ्लेक्स, बॅनर आणि जाहिरात फलक हटवले. महापालिकेने अतिक्रमण कारवाई जोरदार सुरु केली असल्याने सदरची कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे व्यापारी, नागरिकांनी कारवाईचा धसका घेतला आहे. वाघोलीतील (Wagholi News) इतर रोडवर दुकानाचे समोरील शेड्सचे नागरिक स्वताहून काढून घेत आहेत.
शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी आणि सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणारी बांधकामे हटवण्यावर प्रशासनाचा भर आहे. मात्र, महापालिकेने अतिक्रमणे हटवली असली तरी संबंधित ठिकाणी पुन्हा अतिक्रमण (Wagholi News) होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केवळ कारवाई करून थांबण्याऐवजी नियमित देखरेख आणि कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा काही दिवसांतच पुन्हा परिस्थिती जैसे थे होण्याची शक्यता आहे.






