Baramati News : बारामतीच्या भूलतज्ज्ञांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!
Baramati News : वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक आरोग्य जनजागृती आणि आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

Baramati News : वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक आरोग्य जनजागृती आणि आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. इंडियन सोसायटी ऑफ अॅनेस्थेशिऑलॉजिस्ट्सच्या (ISA) बारामती शाखेने यंदाचे दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार पटकावून बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. (Baramati News)
दिल्ली येथे ISA चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नवीन जी. मल्होत्रा यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. बारामती शाखेला ‘बेस्ट सिटी ब्रँच – स्मॉल कॅटेगरी’ हा राष्ट्रीय पुरस्कार, तर सार्वजनिक जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘पब्लिक अवेअरनेस अॅवॉर्ड – स्पेशल कन्सोलेशन प्राइज’ देऊन गौरविण्यात आले आहे. (Baramati News)
बारामती शाखेने गेल्या काही वर्षांत केवळ वैद्यकीय उपचारांपुरते कार्य मर्यादित न ठेवता सामाजिक आरोग्याच्या प्रश्नांवरही लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, सीपीआर अर्थात हृदयविकार किंवा हृदयक्रिया बंद पडल्याच्या आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण, रुग्णसुरक्षा आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संघटनेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या सामूहिक आणि सातत्यपूर्ण कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत दोन पुरस्कारांनी शाखेला सन्मानित करण्यात आले. (Baramati News)
ज्येष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. अशोक तांबे यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, बारामती शाखेचे सदस्य जनजागृती आणि जीवनसंजीवनी प्रशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे करीत आहेत. समाजातील कोणत्याही घटकाला असे प्रशिक्षण हवे असल्यास संघटनेचे सदस्य सहकार्य करण्यास तयार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत समाजाच्या मदतीसाठी संघटनेचे सदस्य सदैव तत्पर राहतील. (Baramati News)
ISA चे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य डॉ. सुजित अडसुळ यांनी हे दोन्ही पुरस्कार संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगितले. जीवनसंजीवनी प्रक्रियेचे प्रशिक्षण समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटना कटिबद्ध असून, या प्रवासात ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. संजीव कोल्हटकर आणि डॉ. अशोक तांबे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मोलाचे ठरल्याचे त्यांनी नमूद केले. (Baramati News)
शाखेचे अध्यक्ष डॉ. दादासाहेब वायसे आणि सचिव डॉ. निकिता मेहता यांनी या पुरस्कारांमुळे संघटनेच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याची भावना व्यक्त केली. यापुढेही सार्वजनिक आरोग्य जनजागृती आणि सामाजिक आरोग्यसेवेचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. (Baramati News)
या यशात महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश तगडपल्ले, उपाध्यक्ष डॉ. दिलीप देसाई, सचिव डॉ. शीतल दलाल, तसेच डॉ. सौरभ बर्डे, डॉ. सचिन चांदोलकर, डॉ. अविनाश भोसले, डॉ. शिल्पा तिवसकर यांच्यासह राज्यातील पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले. या राष्ट्रीय सन्मानाबद्दल राज्यातील पदाधिकाऱ्यांनी बारामती शाखेचे अभिनंदन केले आहे. (Baramati News)
Baramati News : बारामती एमआयडीसीत उद्योजकाच्या डिफेंडर कारवर गोळीबार; दोन लाखांच्या खंडणीची मागणी?




