Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगाटने घेतला यू-टर्न! निवृत्ती मागे घेत आगामी ऑलिम्पिकसाठी सुरु केली तयारी

विनेश फोगाटने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक भावनिक पोस्ट केली आहे. “लोक मला नेहमी विचारत होते की पॅरिस हे माझे शेवटचे आव्हान होते का? बऱ्याच काळापर्यंत माझ्याकडे याचे उत्तर नव्हते. मला मॅटपासून, दबावापासून, अपेक्षांपासून, आणि माझ्या महत्त्वाकांक्षेपासूनही दूर राहायचे होते. अनेक वर्षांत पहिल्यांदाच मी स्वतःला शांतपणे श्वास घेण्याची संधी दिली,” असे तिने पोस्टमध्ये नमूद केले.
आता लक्ष्य लॉस एंजिल्स २०२८ ऑलिम्पिक –
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) December 12, 2025
विनेश फोगाट पुढे म्हणाली, “माझ्यावर झालेले संस्कार, दिनचर्या, संघर्ष हे सर्व माझ्या आत भिनलेले आहे. मी कितीही दूर गेले तरी, माझा एक भाग मॅटवरच राहिला आहे. कुस्तीबद्दलची माझी आवड कधीच कमी झाली नाही. त्यामुळे मी आता निडर मनाने आणि कधीही न झुकणाऱ्या आत्मविश्वासाने लॉस एंजिल्स २०२८ ऑलिम्पिकच्या दिशेने परत पाऊल टाकत आहे.” असे सांगत विनेशने घोषणा केली.
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा शतकी धडाका कायम! अंडर-१९ आशिया कपमध्ये रचला नवा इतिहास
‘माझा मुलगा माझ्या टीममध्ये सामील होतोय’ –
विनेशने पुढे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, यावेळेस ती एकटी नसणार आहे. “माझा मुलगा माझ्या टीममध्ये सामील होत आहे. लॉस एंजिल्स ऑलिम्पिकच्या या प्रवासात माझा छोटासा चीअरलीडर,” असे सांगत तिने तिच्या मुलाच्या साथीचा उल्लेख केला. पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर विनेशने ‘कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन’मध्ये अपील केली होती, मात्र सुनावणीला विलंब झाल्यामुळे तिची अपील नंतर फेटाळली गेली.
हेही वाचा – Gautam Gambhir : अर्शदीपच्या ७ वाईडनंतर गंभीरचा पारा चढला, हँडशेकमधला राग पाहिलात का? VIDEO व्हायरल
विनेशने तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला असला तरी तिला एकदाही पदक जिंकता आलेले नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्य, आशियाई क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदके तिच्या नावावर आहेत. याव्यतिरिक्त, ती २०२४ मध्ये हरियाणातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणूनही निवडून आली आहे.





