Sujeet Kalkal Gold : २-९ ने पिछाडीवर असताना शेवटच्या ५० सेकंदांत मारली बाजी! सुजीत कलकलने कुस्तीत जिंकले सुवर्ण; पाहा VIDEO
Sujeet Kalkal Gold : सुजीत कालकल आपल्या प्रतिस्पर्ध्याला आव्हान देईल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. त्यामुळे त्याच्या सामन्याचे प्रसारणही झाले नाही, पण त्याने ऑलिम्पिक चॅम्पियनला हरवून सुवर्णपदक पटकावले.

Asian Games 2026 Wrestling Sujeet Kalkal Wins Historic Gold In 65kg : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) च्या कुस्ती आखाड्यात भारताचा युवा मल्ल सुजीत कलकलने (Sujeet Kalkal) अविश्वसनीय पुनरागमन करत सुवर्णपदकाला (Gold Medal) गवसणी घातली आहे. पुरुषांच्या फ्रीस्टाइल ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात सुजीतने ताजिकिस्तानच्या अब्दुलमजीद कुडिएवचा १०-९ असा थरारक पराभव केला. एका क्षणी २-९ असा पिछाडीवर फेकल्या गेलेल्या सुजीतने अखेरच्या काही सेकंदांत सामन्याचा पासा पालटून भारतासाठी अनपेक्षित सुवर्ण वेध साधला.
शेवटच्या ७५ सेकंदांत वादळ; पिछाडी भरून काढत मारली बाजी!
अंतिम फेरीत ताजिकिस्तानच्या कुडिएवने सुरुवातीलाच २-९ अशी भक्कम आघाडी घेत सामना एकतर्फी झुकवला होता. सामना संपायला अवघे १ मिनिट १५ सेकंद शिल्लक असताना सुजीत ६-९ ने मागे होता. त्यानंतर ताकदवान टेकडाउन करत त्याने फरक ८-९ असा कमी केला. अखेरचे ५० सेकंद शिल्लक असताना रौप्यपदक समोर दिसत होते; मात्र सुजीतने विजेच्या चपळाईने प्रतिस्पर्ध्याला चीतपट करत निर्णायक २ गुण खेचले आणि १०-९ ने बाजी मारली.
योगेश्वर दत्त आणि बजरंग पुनियाच्या सुवर्ण परंपरेला उजाळा!
WATCH HOW SUJEET KALKAL TURNED A 9-2 DEFICIT INTO ASIAN GAMES GOLD. 🎥🔥🇮🇳
DON’T BLINK. THIS COMEBACK HAPPENED IN REAL TIME. 🤼♂️
THE SCORE SAID 9-2.
THE CLOCK SAID “TOO LATE.”
SUJEET KALKAL SAID “WATCH ME.” 🇮🇳🔥🤼♂️
9-2 → 10-9. GOLD. 🥇
Eight points.
Two minutes.
One unbelievable… pic.twitter.com/ozTw9w5PBN— Anil Bansal (@dilseanilbansal) October 2, 2026
६५ किलो वजनी गटाला भारतीय कुस्तीत सोनेरी इतिहास आहे. यापूर्वी भारतासाठी २०१४ च्या इनचॉन आशियाडमध्ये योगेश्वर दत्तने, तर २०१८ च्या जकार्ता आशियाडमध्ये बजरंग पुनियाने याच ६५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. बजरंगच्या पावलावर पाऊल ठेवत सुजीतने हा वारसा पुढे नेला असून, या वजनी गटात आशियाई चॅम्पियन बनणारा तो तिसरा भारतीय मल्ल ठरला आहे.
गावच्या लाल मातीतून प्रवास; राष्ट्रीय मल्ल वडिलांची प्रेरणा!
Sujeet 🇮🇳 over Olympic champion Kotaro Kiyooka 🇯🇵, 3-3
He will wrestle for 65kg 🥇 at Asian Games pic.twitter.com/LOTQiqTn05
— United World Wrestling (@wrestling) October 2, 2026
५ नोव्हेंबर २००२ रोजी हरयाणातील भिवानी जिल्ह्यातील इमलोटा गावात जन्मलेल्या सुजीतला कुस्तीचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्याचे वडील दयानंद कलकल हे स्वतः राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होते, त्यांनीच सुजीतला आखाड्यात उतरवले. गावातील मर्यादित साधनांमध्ये २०२० पर्यंत सराव केल्यानंतर २०२१ मध्ये त्याने सोनिपत गाठले, जिथे आंतरराष्ट्रीय मल्लांसोबतच्या सरावाने त्याच्या खेळाला नवी धार दिली.
अंडर-२३ चॅम्पियन ते आशियाड सुवर्णपदक विजेता!
From 2-9 to winning 10-9 for India! 🔥
– Undefeated this year, Sujeet Kalkal went on to win Gold at Asian Games 2026 🥇
Don’t miss the celebration at end! 🇮🇳🥹 pic.twitter.com/iqps0l2CqD https://t.co/t2HHGRmGqW
— The Khel India (@TheKhelIndia) October 2, 2026
सुजीतने २०२२ मध्ये किर्गिस्तान येथे अंडर-२३ आशियाई स्पर्धा, बहरीनमध्ये अंडर-२० स्पर्धा आणि ट्युनिशियातील सिनियर रँकिंग सिरीज जिंकून जागतिक मंचावर दबदबा निर्माण केला होता. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्याने स्वतःला जागतिक स्तरावरील अव्वल कुस्तीपटू म्हणून सिद्ध केले आहे.





