Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा शतकी धडाका कायम! अंडर-१९ आशिया कपमध्ये रचला नवा इतिहास

Vaibhav Suryavanshi Century in U19 Asia Cup 2025 : अंडर-१९ आशिया कप २०२५ स्पर्धेची शानदार सुरुवात झाली असून, पहिल्याच सामन्यात भारतीय संघाच्या वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला आहे. या उदयोन्मुख फलंदाजाने अंडर-१९ आशिया कपच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक झळकावणारा खेळाडू बनण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याने हे ऐतिहासिक शतक केवळ ५६ चेंडूंमध्ये पूर्ण केले, ज्यात त्याने ९ उत्तुंग षटकार आणि ५ चौकार मारले.
वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास –
वैभव सूर्यवंशी सध्या दुबईमध्ये सुरू असलेल्या अंडर-१९ आशिया कपमध्ये भारताकडून आपले कौशल्य दाखवत आहे. शतकी खेळी करून त्याने इतिहास रचला आहे. यापूर्वी, तो ‘रायझिंग आशिया कप’ स्पर्धेतही चमकला होता, जिथे तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. साल २०२५ हे संपूर्णपणे वैभव सूर्यवंशीच्या नावावर राहिले आहे.
Vaibhav Suryavanshi brings up a U-19 Asia Cup century 💯
📷 – BCCI.#indvssa #viratkohli #rohitsharma #shubmangill #bharatarmy #COTI 🇮🇳 #rishabhpant #jaspritbumrah #dhoni pic.twitter.com/eZPJqKYT7S
— The Bharat Army (@thebharatarmy) December 12, 2025
२०२५ मध्ये झळकावले सहावे शतक –
Death, Taxes and our Boss Baby tonking bowlers over the fence for sixes… 🙌
Watch Vaibhav Suryavanshi in action against UAE in India’s opening match of the #DPWorldMensU19AsiaCup2025 LIVE, on Sony Sports Network TV channels & Sony LIV NOW!#SonySportsNetwork pic.twitter.com/1tESMFU7el
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) December 12, 2025
या वर्षाच्या सुरुवातीला त्याने आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्याने इंग्लंडमध्ये युवा एकदिवसीय सामन्यात आणि ऑस्ट्रेलियातील युवा कसोटी सामन्यातही शतके झळकावली. अलीकडेच, ‘इंडिया ए’ कडून खेळताना ३२ चेंडूत शतक आणि घरगुती टी२० क्रिकेटमध्ये शतक झळकावल्यानंतर, आता त्याने अंडर-१९ आशिया कपमध्ये आपले सहावे शतक पूर्ण केले आहे.
हेही वाचा – Gautam Gambhir : अर्शदीपच्या ७ वाईडनंतर गंभीरचा पारा चढला, हँडशेकमधला राग पाहिलात का? VIDEO व्हायरल
विशेष म्हणजे, या १४ वर्षीय फलंदाजाने टेस्ट, वनडे आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावून एक मोठी कामगिरी साधली आहे. या सामन्यात यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब झाली, आयुष म्हात्रे ४ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर वैभव सूर्यवंशीचा झंझावात सुरू झाला.
हेही वाचा – India vs South Africa T20: डी कॉकच्या वादळी खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेचा भारतावर 51 धावांनी विजय
त्याने ९५ चेंडूंमध्ये १४ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १७१ धावांची वादळी खेळी साकारली. ज्यामुळे भारताला चारशे धावांचा डोंगर पार करता आला. भारताने ६ बाद ४३३ धावा करत यूएईसमोर ४३४ धावांचे लक्ष्य उभा केले आहे.





