Bus Accident : मोठी दुर्घटना…! महाराष्ट्र ST महामंडळाच्या दोन बसचा भिषण अपघात; 7 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
Bus Accident : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे.

Bus Accident : गुजरातमधील सुरत जिल्ह्यात मंगळवारी अत्यंत भीषण अपघात घडला. महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर जोरदार धडक झाल्यानंतर एका बसने पेट घेतल्याने किमान सात प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. Bus Accident()
प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात बार्डोली तालुक्यातील उवा आणि माणेकपूर गावादरम्यान धुळे-सुरत महामार्गावर घडला. धुळ्याहून नवापूरमार्गे सुरतच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि समोरून येणारी दुसरी एसटी बस यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेनंतर एक बस महामार्गावर पलटी झाली आणि काही क्षणांतच बसला भीषण आग लागली. (Bus Accident)
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस पलटल्यानंतर मोठा स्फोटासारखा आवाज झाला आणि आग झपाट्याने संपूर्ण बसमध्ये पसरली. त्यामुळे काही प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आगीत अडकलेल्या सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Bus Accident)
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. (Bus Accident)
मृत प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी बार्डोली येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस आणि संबंधित यंत्रणा तपास करत आहेत. (Bus Accident)
या दुर्घटनेमुळे धुळे-सुरत महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (Bus Accident)





