Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 मोठे निर्णय! शेतकरी, रस्ते विकास आणि शिक्षण क्षेत्राला मोठा दिलासा
Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पायाभूत सुविधा, ग्रामीण संपर्क यंत्रणा आणि उच्च शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने ३ अत्यंत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयासोबतच ग्रामीण रस्ते विकास, राज्यातील पायाभूत सुविधा आणि उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था, राज्यातील रस्ते विकास आणि शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. (Maharashtra Cabinet)
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी परदेशी कर्जाला मंजुरी (Maharashtra Cabinet)
राज्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला गती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून (AIIB) 500 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचे कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet)
यासोबतच राज्य सरकारच्या निधीतूनही आवश्यक आर्थिक तरतूद केली जाणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रस्ते अधिक दर्जेदार होणार असून दुर्गम गावांना चांगली संपर्क सुविधा उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. (Maharashtra Cabinet)
रस्ते सुधारणा प्रकल्पासाठी 17,400 कोटींचे अर्थसाहाय्य (Maharashtra Cabinet)

Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 मोठे निर्णय! शेतकरी, रस्ते विकास आणि शिक्षण क्षेत्राला मोठा दिलासा
राज्यातील प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी आणि सुधारण्यासाठी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक (AIIB) आणि न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) या दोन आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून राज्याला प्रत्येकी 8,700 कोटी रुपये, असे एकूण 17,400 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. या निधीच्या मदतीने महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला वेग मिळणार असून राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे. (Maharashtra Cabinet)
मुंबईतील सहा महाविद्यालयांचा विद्यापीठात समावेश
शिक्षण क्षेत्रातही मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट या समूह विद्यापीठामध्ये मुंबईतील सहा नामांकित महाविद्यालयांचा समावेश करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet)
या महाविद्यालयांमध्ये पुढील संस्थांचा समावेश आहे.
- प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय
- किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय
- श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय
- ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल्ल असोमुल्ल विज्ञान महाविद्यालय
- मुंबई व थडोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय
कोणाला होणार फायदा?
- ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना दर्जेदार रस्ते सुविधा.
- राज्यातील वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती.
- मुंबईतील उच्च शिक्षण संस्थांना अधिक सक्षम शैक्षणिक संरचना.
- उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेल्या संपर्क व्यवस्थेत सुधारणा.
मंत्रिमंडळाच्या या निर्णयांना राज्याच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात असून, त्याचा फायदा ग्रामीण भागापासून ते शिक्षण क्षेत्रापर्यंत विविध घटकांना होणार आहे. (Maharashtra Cabinet)





