SSC HSC Exam 2026 : विद्यार्थ्यांनो, टेन्शन घेऊ नका! तणावातून मुक्त करण्यासाठी ‘हे’ तज्ज्ञ करणार मदत; पाहा
SSC HSC Exam 2026 : पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तणावमुक्त करण्यासाठी समुपदेशकाचे सहाय्य मिळणार आहे.

प्रभात वृत्तसेवा
SSC HSC Exam 2026 – पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तणावमुक्त करण्यासाठी समुपदेशकाचे सहाय्य मिळणार आहे.
इयत्ता (SSC HSC Exam 2026) बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ तर इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे.
विद्यार्थ्यांना तणावविरहित परीक्षा देता यावी, यासाठी पुणे विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांमध्ये तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागीय मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे. विद्यार्थी व पालकांना कोणत्याही अडचणीसाठी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत समुदेशकांशी भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.
परीक्षा काळात मंडळासंबंधी माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध असून, इयत्ता दहावीसाठी – ९४२३०४२६२७, इयत्ता बारावीसाठी – ७०३८७५२९७२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तज्ञ समुपदेशक (पुणे)
योगिनी पाटील – ९९६०६४४४११
आशुमती देशपांडे – ७९७२५७३७४२
वृषाली आठवले – ९८३४०८४५९
तज्ज्ञ समुपदेशक (बारामती)
श्रेया दिघे – ९३५९९७८३१५
तज्ञ समुपदेशक (अहिल्यानगर)
सुनील मोरे – ८१६९२०२२१४
सुजित भोसले – ९३७१६६१२५५
विजया कुलकर्णी – ७२०८४२९३८१
तज्ज्ञ समुपदेशक (सोलापूर)
निकिता गडाख – ७७०९१५६०६८
सुजाता शिंदे – ८४२११५०५२८
वरदा रानडे – ९४०४७८३९९६





