पुणे – बारामती येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्य कराटे स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या विश्वा स्पोटर्स ऍकॅडमीच्या सचिव सृष्टी मोरे यांनी 61 किलो वरिष्ठ महिलांच्या कुमिते प्रकारात सुवर्णपदक जिंकून सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळवला. विश्वा स्पोटर्स अकादमी या संघाने पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत 12 सुवर्ण, 14 रजत व 24 ब्रॉंझपदके पटकावून सांघिक तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र कराटे असोसिएशन व बारामती कराटे असोसिएशन यांनी केले. राज्यभरातून सुमारे 24 जिल्ह्यांतून तब्बल 1800 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
सर्व खेळाडूंना असोसिएशनचे अध्यक्ष सेन्साई रवींद्र कराळे, विश्वा स्पोटर्स अकादमीचे अध्यक्ष प्रितम इचके, सचिव सृष्टी मोरे, उपाध्यक्ष अमित थोरात, कोमल चौधरी, अभिषेक नलावडे, अजय देडे, जगदीश चव्हाण आदी प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजेते खेळाडू – ओंकार इंगोले, भाग्यश्री सोनेकर, संस्कृती नखाते, रेहान शिकलकर, मनमिंत कोर, जयेश पाटील, शौर्या डोमाळे, श्रीनिका पोळ, देबोराह दळवी, आयुष साळुंखे, नील विधाते, सृष्टी मोरे (सर्व सुवर्णपदक). कुणाल धांडे, श्रीया मोरे, आर्यन धायगुडे, समीर गौतम.
वल्लभ भोई, मिराज मिसळे, कृष्णा शर्मा, दियान पिंजरी, मृणाल मोटे, तनिष्का डोमाळे, शुभ्रा शिंदे, अदिती पुरोहित, अर्नव खोत, स्वानंदी शिरभाते, अमित थोरात (सर्व रजतपदक). ईशान्वी खंडाळे, ईश्वरी मालशिक्रे, वरद वाळुंज, सोहम पाटील, सामर्थ्य निंबाळकर, अनुष्का शिष्टे, साक्षी यादव, दिया मेहता, हर्ष सुके, सिमरन शिकलकर, वरद लबडे, साई ठाणगे, सानिका कुलकर्णी, वासुदेव भावे, श्रेया पोळ, परिधी लाळे, भार्गवी नागोटकर, हिमानी जोशी, गार्गी गुल्हाने, शेखीना बोर्डे, शौर्य लाळे, अर्णव चव्हाण, नीरज अल्हाट, ऋग्वेद बोराडे, श्लोक मोटे (सर्व ब्रॉंझपदक).