SL vs NZ : ना हवामान खराब-ना पाऊस, तरीही मध्येच थांबविण्यात आली श्रीलंका-न्यूझीलंड कसोटी, खेळाडूंना मिळाली एका दिवसाची सुट्टी..! जाणून घ्या यामागचे कारण….

SL vs NZ 1st Test (Rest Day) : श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 18 सप्टेंबरपासून सुरू झाला. त्यानुसार चौथ्या दिवसाचा खेळ 21 सप्टेंबरला व्हायला हवा होता, मात्र तो विश्रांतीचा दिवस जाहीर केल्याची चर्चा जास्त आहे. ना हवामान खराब होते ना मैदान ओले होते, किंबहुना असा कोणताही अडथळा आला नाही ज्यामुळे दिवसभराचा खेळ होऊ शकला नाही. मग चौथा दिवस विश्रांतीचा दिवस म्हणून का घोषित करण्यात आला?
या विषयावर अधिकृत निवेदन जारी करताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले की, चौथा दिवस विश्रांतीचा दिवस म्हणून घोषित करण्यात येत आहे. यामागचे कारणही निवेदनात नमूद करण्यात आले आहे, ज्यामध्ये श्रीलंकेत 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार असून यजमान संघाचे खेळाडू आपापल्या मतदारसंघात जाऊन मतदान करतील, असे सांगण्यात आले आहे. या कारणामुळे जिथे 22 सप्टेंबर हा सामन्याचा शेवटचा दिवस असणार होता, तिथे आता 23 सप्टेंबर हा शेवटचा दिवस मानला जाणार आहे.
साल 2022 मध्ये अर्थव्यवस्था कोलमडल्यानंतर श्रीलंकेतील लोक पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. विश्रांतीच्या दिवसाबदल सांगायचे झाले तर, तो सामान्यतः 20 व्या शतकात वापरला जात होता, परंतु कालांतराने हा नियम फारसा वापरला जात नाही. 2008 साली श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान कसोटी सामन्यात शेवटच्या वेळी विश्रांतीचा दिवस लागू करण्यात आला होता.
Mathews (34) survives a late LBW review via umpires-call to make stumps on day 3 with de Silva (34*), the lead 202 heading into the rest day. Wickets – Patel (1) & O’Rourke (3). Catch up on the 1st Test in NZ on @skysportnz with scoring at https://t.co/yOYwdofZHz #SLvNZ 📷 = SLC pic.twitter.com/dL0Ya7Jj4A
— BLACKCAPS (@BLACKCAPS) September 20, 2024
सामन्याची स्थिती काय…?
या सामन्यात श्रीलंकेने प्रथम खेळताना 305 धावा केल्या होत्या. या डावात 114 धावांचे शतक झळकावून कामिंडू मेंडिस पुन्हा एकदा चर्चेत आला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 340 धावांवर आटोपला. केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल यांनी अर्धशतके केली. दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने 4 गडी गमावून 237 धावा केल्या असून त्यांची आघाडी 202 धावांपर्यंत वाढली आहे. सध्या अँजेलो मॅथ्यूज (34 धावा) आणि कर्णधार धनंजय डी सिल्वा देखील 34 धावांसह खेळपट्टीवर नाबाद आहे.





