SL vs NZ T20 Series 2024/25 : टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, ‘या’ स्टार खेळाडूचा पत्ता कट…

New Zealand vs Sri Lanka T20 Series 2024/25 : श्रीलंका क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. ज्यासाठी श्रीलंकेने आपला संघ जाहीर केला आहे. या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे मिश्रण आहे. श्रीलंका 3 सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.
स्टार खेळाडूचा पत्ता कट…
क्रिकेट श्रीलंकेने टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली असून, त्यात दुनिथ वेल्लालाघेला संधी मिळालेली नाही. त्यामुळे तो टी-20 मालिकेचा भाग असणार नाही. दुनिथ वेल्लालाघेकडे स्टार खेळाडू म्हणून पाहिले जाते. या 21 वर्षीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडलेली आहे. मात्र, सध्या या मालिकेसाठी संघाची कमान चरिथ असलांका यांच्याकडे देण्यात आली आहे.
दुसरीकडे न्यूझीलंडने वनडे आणि टी-20 फॉरमॅटसाठी नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. मिचेल सँटनर याच्यावर संघाची जबाबदारी आली आहे. त्याने केन विल्यमसनची जागा घेतली आहे. 28 डिसेंबरपासून न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे. दुसरा सामना 30 डिसेंबरला तर तिसरा सामना 2 जानेवारीला होणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकेचा संघ :- चरिथ असलांका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस, अविष्का फर्नांडो, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, भानुका राजपक्षे, वानिंदु हसरंगा, चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, जेफरी वांडरसे, नुवान तुषारा, असिथा फर्नांडो, बिनुरा फर्नांडो, महेश थीक्षाना.





