बंगळुरू – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांच्या निवासस्थानी घुसून भाजप युवा आघाडीचे हत्या झालेले नेते प्रवीण नेत्तर यांना न्याय मिळावा या मागणीसाठी चांगलाच धुडगूस घातला. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करून या कार्यकर्त्यांना तेथून हुसकाऊन लावले.
“अडचणीत असलेला माणूस…” साश्रू नयनांनी खोतकरांनी जाहीर केला एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय
आंदोलकांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्यांच्या सहयोगी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली, हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रवीण नेत्तर यांच्या हत्येमागे या संघटनांचा हात असल्याचा आरोप केला आहे. गृहमंत्र्यांच्या घरात घुसलेल्या अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन केले.
ना दिलगिरी, ना माफी महाराष्ट्राबाबतच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपाल कोश्यारी म्हणतात…
पोलिसांनी त्यांना तेथून निघून जाण्याची विनंती केली पण ती त्यांनी धुडकाऊन लावल्यानंतर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दक्षिण कन्नड येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हास्तरीय पदाधिकारी नेत्तर यांची मंगळवारी रात्री मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली. या प्रकरणात आत्तापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
“…त्यांना सुद्धा धडा शिकवण्याची ताकद इथल्या सामान्य माणसात आहे”- शरद पवार