Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप
Wagholi News: वाघोलीध्ये भाजपा पक्षाची चिन्ह असलेली उपरणे आणि सत्कार समारंभ दिमाखात पार

वाघोली : पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर निवडणूक होत असून याची आचारसंहिता सध्या सुरू आहे. याच कालावधीत वाघोलीध्ये भाजपचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाची आयोजकांनी पोलिसांकडून परवानगी घेतली नव्हती. मात्र भाजपा पक्षाची चिन्ह असलेली उपरणे आणि सत्कार समारंभ दिमाखात पार पडले.
पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघोलीमध्ये एक अधिकृत मतदान केंद्रही निश्चित करण्यात आले आहे. अशा काळात आणि मतदान केंद्राच्या परिसरात पक्षाचे चिन्ह असलेली उपरणे परिधान करून, सत्कार सोहळे आयोजित केले गेल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे का? असा थेट सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
‘भाजपा पक्षाचा कार्यक्रम होता म्हणून त्या कार्यक्रमात पक्षाचे चिन्ह असलेले उपरणे घालण्यात आले. पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या आचार संहिता याबाबत माहिती नाही. आयोजकांनी कार्यक्रम घेतला त्यांना परवानगी बाबत माहिती असेल,” अशी प्रतिक्रिया भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सातव यांनी दिली.





