Murli Manohar Joshi : पारदर्शक नोकरशाही ही लोकशाहीची गरज; मुरली मनोहर जोशींनी व्यक्त केले मत
निवडणुका निष्पक्ष आणि नोकरशाही पारदर्शक असेल, तर जनतेने निवडून दिलेले सरकार कोसळू नये, असे भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी (Murli Manohar Joshi) यांनी गुरुवारी म्हटले.

Murli Manohar Joshi : निवडणुका निष्पक्ष आणि नोकरशाही पारदर्शक असेल, तर जनतेने निवडून दिलेले सरकार कोसळू नये, असे भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी (Murli Manohar Joshi) यांनी गुरुवारी म्हटले. संविधानाचे उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, असेही त्यांनी सांगितले. येथे आयोजित २१ व्या फिक्की उच्च शिक्षण परिषदेदरम्यान पत्रकारांशी बोलताना जोशी यांनी हे मत व्यक्त केले.
एसआयआर प्रक्रियेतील कथित अनियमिततेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून होत असलेल्या मागणीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. निष्पक्ष निवडणुका, जबाबदार सरकार आणि पारदर्शक नोकरशाही ही लोकशाहीची मूलभूत गरज असल्याचे जोशी (Murli Manohar Joshi) म्हणाले.
विरोधी पक्ष संवेदनशील आणि जबाबदार असून त्यांच्याकडे स्पष्ट पर्यायी कार्यक्रम असणे आवश्यक आहे. मात्र, हे सर्व संविधानाच्या चौकटीत राहूनच झाले पाहिजे, असे त्यांनी (Murli Manohar Joshi) स्पष्ट केले.






