Sri Lanka Squad : टी-२० विश्वचषकासाठी श्रीलंकेचा संघ जाहीर! दासुन शनाकाकडे नेतृत्व, तर दुखापतग्रस्त ‘या’ खेळाडूलाही मिळाली संधी
Sri Lanka Squad : यजमान श्रीलंकेने सर्वात शेवटी आपल्या १५ सदस्यीय फौजेची घोषणा केली आहे.

Sri Lanka squad Announce for T20 World Cup 2026 : टी-२० वर्ल्ड कप २०२६ या स्पर्धेसाठी सर्व २० देशांनी आपले संघ जाहीर केले असून, यजमान श्रीलंकेने सर्वात शेवटी आपल्या १५ सदस्यीय फौजेची घोषणा केली आहे. अनुभवी दासुन शनाका याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, दुखापतीशी झुंज देणाऱ्या इशान मलिंगाला देखील जागतिक स्पर्धेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे.
अनुभवी फलंदाज आणि अष्टपैलूंची फौज –
श्रीलंकेच्या या संघात मर्यादीत षटकांतील क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेले खेळाडू आहेत. सलामीला पथुम निसांका, कुसल मेंडिस आणि कुसल परेरा यांसारख्या स्फोटक फलंदाजांची फळी आहे. तर मधल्या फळीत चरिथ असलांकावर मोठी जबाबदारी असेल.
अष्टपैलू खेळाडूंची ताकद: वानिंदू हसरंगा, कामिंदू मेंडिस आणि दुनिथ वेल्लालागे यांच्या रूपाने श्रीलंकेकडे दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत, जे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात सामन्याचा निकाल फिरवू शकतात.
मिस्ट्री स्पिन आणि वेगवान मारा –
गोलंदाजीची धुरा मिस्ट्री स्पिनर महेश तीक्षाना सांभाळणार आहे. त्याला साथ देण्यासाठी अनुभवी दुष्मंथा चमीरा आणि ‘बेबी मलिंगा’ म्हणून ओळखला जाणारा मथीशा पथिराना वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करतील. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा श्रीलंकेला निश्चितच मिळेल.
View this post on Instagram
८ फेब्रुवारीपासून मोहिमेला होणार सुरुवात –
श्रीलंका संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ८ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये आयर्लंडविरुद्ध करेल.
८ फेब्रुवारी: विरुद्ध आयर्लंड (कोलंबो)
१२ फेब्रुवारी: विरुद्ध ओमान (पल्लेकेले)
१६ फेब्रुवारी: विरुद्ध ऑस्ट्रेलिया (पल्लेकेले)
१९ फेब्रुवारी: विरुद्ध झिम्बाब्वे (कोलंबो)
टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी श्रीलंकेचा संघ:
२०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी श्रीलंकेचा संघ
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, कामिल मिशारा, कुसल मेंडिस, कामिंडू मेंडिस, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलांका, जेनिथ लियानगे, पवन रथनायके, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लागे, महीश तीक्षाना, दुष्मंथा चमीरा, मथीशा पथिराना, इशान मलिंगा.





