Indian Womens Team : विश्वविजेत्या टीम इंडियाचे पुनरागमन! श्रीलंका टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; स्मृती खेळणार की नाही?

Indian Womens Team announced for T20i series : पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकणारा भारतीय महिला संघ लवकरच मैदानावर परतणार आहे. विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघ डिसेंबर महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील १५ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे, ज्यात उपकर्णधार स्मृती मानधनाचाही समावेश आहे.
विश्वचषकानंतर टीम इंडिया ब्रेकवर
२ नोव्हेंबर रोजी विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ ब्रेकवर होता. संघातील काही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये नक्कीच सक्रिय होत्या, पण बहुतांश खेळाडूंनी या वेळेचा उपयोग आराम करण्यासाठी आणि स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी केला. श्रीलंकेचा संघ पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येत आहे, जी विश्वचषकानंतर टीम इंडियाची पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असेल. ही पाच सामन्यांची टी-२० मालिका २१ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
स्मृती मानधनाचे पुनरागमन चर्चेत –
🚨 News 🚨#TeamIndia’s squad for the 5⃣-match T20I series against Sri Lanka Women announced.
More details – https://t.co/CS41IPCECP#INDvSL | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/uqavBNZpEL
— BCCI Women (@BCCIWomen) December 9, 2025
या संघात विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील बहुतांश खेळाडूंचा समावेश आहे. परंतु, यात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव आहे ते स्मृती मानधनाचे. अलीकडेच स्मृतीला तिचे लग्न मोडल्याने खासगी आयुष्यात मोठा धक्का बसला होता. २३ नोव्हेंबर रोजी संगीतकार पलाश मुच्छलसोबत तिचे लग्न होणार होते, परंतु त्याच दिवशी ते पुढे ढकलण्यात आले आणि त्यानंतर दोन आठवड्यांनी स्मृतीने लग्न मोडल्याची घोषणा केली.
हेही वाचा – R Ashwin : आर. अश्विनच्या पोस्टमध्ये दिसली सनी लिओनी! काय आहे व्हायरल पोस्टमागची खरी ‘भानगड’? जाणून घ्या
अशा परिस्थितीत, खासगी आयुष्यातील या मोठ्या धक्क्यानंतर स्मृती मानधना लगेच मैदानावर उतरते की विश्रांती घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्मृतीने आपण पुनरागमनासाठी पूर्णपणे तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ती श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसणार आहे.
हेही वाचा – R Ashwin : आर. अश्विनच्या पोस्टमध्ये दिसली सनी लिओनी! काय आहे व्हायरल पोस्टमागची खरी ‘भानगड’? जाणून घ्या
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमाह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग, रिचा घोष, जी कमलिनी, श्री चरणी आणि वैष्णवी शर्मा





