Pat Cummins : टी-२० वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर, संघात केले दोन मोठे बदल
Pat Cummins : वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Pat Cummins ruled out from T20 World Cup 2026 : टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा रणसंग्राम सुरू व्हायला अवघे काही दिवस उरले असताना, जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. कमिन्सच्या बाहेर पडण्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची धार कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पॅट कमिन्स का झाला बाहेर?
पॅट कमिन्स गेल्या काही काळापासून पाठीच्या जुन्या दुखापतीमुळे (Back Injury) त्रस्त होता. या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे सावरू शकलेला नाही. ऑस्ट्रेलियाच्या मेडिकल टीमने त्याला विश्रांती आणि रिहॅबचा सल्ला दिल्याने तो या महत्त्वाच्या स्पर्धेला मुकणार आहे. कमिन्सच्या जागी बेन ड्वार्शियस याचा १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे.
मॅथ्यू शॉर्टला डच्चू, रेनशॉची एन्ट्री –
ऑस्ट्रेलियन संघात आणखी एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. खराब फॉर्ममुळे मॅथ्यू शॉर्टला संघातून डच्चू देण्यात आला असून, त्याच्या जागी सध्या जबरदस्त लयीत असलेल्या मॅट रेनशॉला संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथला पुन्हा एकदा डावलण्यात आले असून त्याला संघात स्थान मिळालेले नाही.
A big setback for Australia ahead of the T20 World Cup as Pat Cummins is ruled out due to injury💔
Ben Dwarshuis named as his replacement in Australia’s squad.⬆️#T20WC2026 #PatCummins pic.twitter.com/6x1jSUqbpr
— OneCricket (@OneCricketApp) January 31, 2026
हेझलवूड, टिम डेव्हिड आणि नॅथन एलिस फिट!
कांगारूंच्या गोटातून काही सकारात्मक बातम्याही समोर आल्या आहेत. दुखापतीमुळे त्रस्त असलेले जोश हेझलवूड, टिम डेव्हिड आणि नॅथन एलिस हे तिघेही वर्ल्ड कपसाठी पूर्णपणे तंदुरुस्त (Fit) घोषित करण्यात आले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या सामन्यांचे वेळापत्रक:
ऑस्ट्रेलियाचा समावेश ‘ग्रुप बी’ मध्ये असून त्यांचे सामने खालीलप्रमाणे होतील:
११ फेब्रुवारी: विरुद्ध आयर्लंड (कोलंबो)
१३ फेब्रुवारी: विरुद्ध झिम्बाब्वे (कोलंबो)
१६ फेब्रुवारी: विरुद्ध श्रीलंका (पल्लेकेले)
२० फेब्रुवारी: विरुद्ध ओमान (पल्लेकेले)
हेही वाचा – KL Rahul Bowled : हरप्रीत ब्रारचा तो ‘मिस्ट्री बॉल’ अन् केएल राहुलचा उडाला मधला स्टंप! पाहा VIDEO
टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी ऑस्ट्रेलियाचा संघ:
मिचेल मार्श (कर्णधार), जेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शियस, कॅमेरून ग्रीन, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट रेनशॉ, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झाम्पा.





