SRH vs MI सामन्यात झाली फिक्सिंग? इशानच्या निर्णयाने चर्चेला उधाण, VIDEO होतोय व्हायरल

SRH vs MI Ishan Kishan accused of fixing during IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या हंगामाच्या मध्यभागी अचानक मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप होऊ लागले आहेत. जगातील सर्वात मोठी टी-२० लीग खेळातील सर्वात वाईट गुन्हा करत असल्याच्या आवाज उठू लागले आहेत. राजस्थान रॉयल्सवर अलीकडेच असे आरोप झाल्यानंतर आता सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यादरम्यान हे गंभीर आरोप केले जात आहेत. यामागील कारण म्हणजे एक निर्णय होता जो कोणाच्याही समजण्यापलीकडे होता आणि तो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
इशान किशनच्या विकेटवरून झाला गोंधळ –
खरंतर, हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सनरायझर्सने प्रथम फलंदाजी केली. यादरम्यान, सनरायझर्सचा फलंदाज इशान किशन पंचाने त्याला बाद घोषित करण्यापूर्वीच पॅव्हेलियनमध्ये परत जाऊ लागला, तर पंचांनी लेग साईडवरील हा चेंडू आधी वाईड घोषित केला होता. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनीही कोणतेही अपील केले नाही पण इशान स्वतः पॅव्हेलियनमध्ये परतू लागला, त्यानंतर पंचांनीही त्याला बाद घोषित केले.
🚨 ONE OF THE STRANGE MOMENT IN IPL HISTORY 🚨
– Not many MI player appealed.
– Ishan walked away.
– He thought there was an edge.
– Every MI player appreciated the decision of Ishan.
– But replay showed there was no Edge. pic.twitter.com/XhpoSP2EhJ— Johns. (@CricCrazyJohns) April 23, 2025
नक्की काय घडलं?
🚨 ISHAN KISHAN DISMISSAL MOMENT 🚨 pic.twitter.com/y75dm8v0bM
— Johns. (@CricCrazyJohns) April 23, 2025
झालं असं की दुसऱ्या षटकात इशान किशन फलंदाजीला आला होता. तो एक धाव काढून फलंदाजी करत होता. २.१ षटकांत, इशान किशन दीपक चहरच्या गोलंदाजीवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू इशानच्या बॅटला न लागता यष्टिरक्षक रायन रिकेलटनच्या ग्लोव्हजमध्ये गेला. यानंतर मुंबईच्या कोणत्याच खेळाडूने अपील केले नाही. मात्र, पंचांनी अर्धवट हात वर केलेल्या पाहून, मुंबईच्या खेळाडूंनी अपील केले आणि पंचांनी आऊटचा निर्णय दिला. पण मनोरंजक गोष्ट म्हणजे चेंडूचा इशानच्या बॅटला स्पर्श झाला नव्हता. तरी देखील इशान डीआरएस न घेताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचा हा प्रामाणिकपणा हैदराबादसाठी महागात पडला. अशा परिस्थितीत, राजस्थान रॉयल्सच्या मागील सामन्यांच्या निकालांनंतर झालेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे या सामन्यावर आधीच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
हेही वाचा – SRH vs MI : इशान किशनचा ‘तो’ प्रामानिकपणा हैदराबादला पडला महागात, VIDEO होतोय तुफान व्हायरल
सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगचे होतायेत आरोप –
Sad to say, but today’s match felt totally FIXED 🥲
Terrible acting by Ishan Kishan, the umpire, and some MI players.
Not even trying to hide it anymore?#SRHvsMI #SRHvMI pic.twitter.com/IyaD5AwLiK— Manglam Mishra (@ManglamMis67977) April 23, 2025
MI didn’t appeal, but Ishan Kishan and the umpires acted like he was definitely out.
Turns out, he wasn’t out at all. 💀 pic.twitter.com/KxYZeXQUrf
— Dinda Academy (@academy_dinda) April 23, 2025
एकामागून एक, सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी या सामन्यात संघ आणि खेळाडू दोघांवरही फिक्सिंगचा आरोप केला. यामुळे ‘एक्स’ वर ‘फिक्सिंग’ हा शब्द ट्रेंड होऊ लागला आणि सर्वांनी या सामन्यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. या हंगामापूर्वी इशान किशन मुंबई इंडियन्सचा भाग असल्यानेही हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तो ७ वर्षे या फ्रँचायझीचा भाग होता आणि यावेळी तो संघापासून वेगळा झाला. अशा परिस्थितीत चाहत्यांनी इशानवर त्याच्या जुन्या टीमला मदत केल्याचा आरोप करायला सुरुवात केली.





