IND vs ENG 2nd T20I : मँचेस्टरमध्ये इंग्लंडने भारताचा उडवला धुव्वा! जेकब बेथलने ठोकले वादळी अर्धशतक
IND vs ENG 2nd T20I : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची खराब कामगिरी सुरूच असून सलग ४ सामन्यांनंतरही भारताला एकही विजय मिळवता आलेला नाही.

IND vs ENG 2nd T20I England beat India Jacob Bethell Fifty : मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडने भारताचा ४ गडी (Wickets) राखून पराभव केला आहे. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवला हटवून श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. मात्र, अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची खराब कामगिरी सुरूच असून सलग ४ सामन्यांनंतरही भारताला एकही विजय मिळवता आलेला नाही.
दुसऱ्या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये भारतीय संघाने अभिषेक शर्मा (४३) आणि इशान किशन (४९) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ७ बाद १९० धावा केल्या होत्या, मात्र प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडने जेकब बेथलच्या वादळी अर्धशतकाच्या (७५) जोरावर १९ व्या षटकात ६ गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. यासह ५ सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे.
Ravi Bishnoi threw away the match single handedly. 😡
England needed 49 runs of 24 balls & India were in the control.
Then comes Ravi Bishnoi & throws back to back no balls just to get hammered for 29 runs by Jacob Bethell on free Hits 😤
By the end of over England needed… pic.twitter.com/HJkOAakT2W
— TheFakeFakeer (@TheFakeFakeer) July 4, 2026
वैभव सूर्यवंशीचे वादळी पदार्पण; इशान-अभिषेकची झुंज –
England seal a commanding win!
England chase down 191 in just 19 overs to defeat India by 4 wickets and level the series in style.
Team India is still searching for their first T20I victory since lifting the T20 World Cup. 🇮🇳#ENGvIND #EnglandCricket #TeamIndia pic.twitter.com/3BmfdHAHh0
— SportsTiger (@The_SportsTiger) July 4, 2026
भारताकडून या सामन्यात १५ वर्षांच्या वंडर बॉय वैभव सूर्यवंशीने पदार्पण केले. त्याने आपल्या आक्रमक शैलीत २ उत्तुंग षटकार खेचत १० चेंडूंत १४ धावा केल्या. विल जॅक्सने त्याला यष्टिरचित केले. वैभव आणि अभिषेक शर्मा (४३ धावा) यांच्यात पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी झाली. यानंतर इशान किशनने ४० चेंडूंत ४९ धावांची खेळी केली, तर कर्णधार श्रेयस अय्यरने ३७ धावांचे योगदान दिले. शेवटी तिलक वर्माने ११ चेंडूंत नाबाद २४ धावा करत भारताला १९० पर्यंत पोहोचवले. इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
जेकब बेथेल ठरला इंग्लंडच्या विजयाचा हिरो –
Jacob Bethell won the Player-of-the-Match award for his brilliant unbeaten 76 that ensured England got over the line despite the loss of early wickets.#ENGvIND #England pic.twitter.com/YkvwcTHcvs
— Circle of Cricket (@circleofcricket) July 4, 2026
१९१ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. भारताच्या अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात जोस बटलर आणि फिल सॉल्टला शून्यावर बाद करत खळबळ उडवली. मात्र, त्यानंतर कर्णधार हॅरी ब्रूकने अवघ्या १५ चेंडूंत ३९ धावा कुटत डाव सावरला. ब्रूक बाद झाल्यावर जेकब बेथेल आणि टॉम बँटन (३९ धावा) यांनी भारताच्या हातातून सामना हिरावून घेतला. बेथेलच्या मॅचविनिंग फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने १ ओव्हर आधीच सामना खिशात घातला.





