IPL 2025 : डब्ल्यूटीसी फायनलमुळे आयपीएल प्लेऑफवर संकट! काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

South African IPL 2025 Players to Miss Playoffs : आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामाला १७ मे पासून सुरुवात होणार आहे. भारत-पाक यांच्यातील तणावामुळे ही स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढ ढकलण्यात आली. ज्यामुळे उर्वरित सामन्याचे वेळापत्रक बदलले आहे. ज्यामुळे आयपीएल संघांच्या परदेशी खेळाडूंबाबतच्या अडचणी वाढल्या आहेत. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंमुळे आयपीएलमधील सात संघांना मोठा धक्का बसणार आहे. कारण हे खेळाडू मायदेशी परतणार असल्याने तो प्लेऑफसाठी उपलब्ध असणार नाहीत. ते मायदेशी का परतणार आहेत? जाणून घेऊया.
काय आहे नेमकं कारण?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल लक्षात घेऊन, दक्षिण आफ्रिकेच्या संघात समाविष्ट असलेले ८ आयपीएल खेळाडू २७ मे रोजी आपापल्या संघातून निघून मायदेशी परततील. याचा अर्थ दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू प्लेऑफ सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाहीत. या आठ खेळाडूंमध्ये कागिसो रबाडा (गुजरात टायटन्स), एडन मार्करम (लखनऊ सुपर जायंट्स), मार्को जानसेन (पंजाब किंग्ज), ट्रिस्टन स्टब्स (दिल्ली कॅपिटल्स), लुंगी एनगिडी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), वियान मुल्डर (सनरायझर्स हैदराबाद), रायन रिकेल्टन आणि कॉर्बिन बॉश (दोघेही मुंबई इंडियन्स) यांचा समावेश आहे.
सीएसएने बीसीसीआयला दिलीय कल्पना –
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, तो ३० मे रोजी दक्षिण आफ्रिकेचा संघ डब्ल्यूटीसी फायनलसाठी ३ जूनपासून अरुंडेल येथे झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्याची तयारी करण्यासाठी युकेला रवाना होईल. ईएसपीएन क्रिकइन्फोने पुष्टी केली आहे की, डब्ल्यूटीसी फायनलचे महत्त्व लक्षात घेता क्रिकेट साउथ आफ्रिका (CSA) ने या खेळाडूंना लवकर सोडण्याबाबत बीसीसीआयशी चर्चा केली आहे.
डब्ल्यूटीसी २०२५ चा फायनल सामना ११ जूनपासून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे. डब्ल्यूटीसी फायनलच्या संघात नसलेले इतर दक्षिण आफ्रिकन खेळाडू आयपीएल २०२५ चा हंगाम संपेपर्यंत संघात राहतील. नवीन वेळापत्रकानुसार, आयपीएल २०२५ चे प्लेऑफचे सामने २९ मे पासून सुरू होतील. पहिला क्वालिफायर २९ तारखेला आणि एलिमिनेटर सामना ३० मे रोजी खेळवला जाईल. दुसरा क्वालिफायर सामना १ जून रोजी होईल आणि जेतेपदाचा सामना रविवार, ३ जून रोजी खेळवला जाईल.





