सोनम कपूरने फ्लॉन्ट केला बेबी बंप; काळ्या साडीत इव्हेंटला हजेरी लावत वेधलं साऱ्यांचे लक्ष

Sonam Kapoor | बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे. अलीकडेच सोनमने सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर तिने एका इव्हेंटला हजेरी लावली. आपल्या फॅशनमुळे ओळखली जाणाऱ्या सोनमने पुन्हा एकदा या इव्हेंटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इव्हेंटमधील सोनमचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. ज्याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे.
सोनमने स्वदेश या ब्रँडच्या इव्हेंटसाठी हजेरी लावली होती. या इव्हेंटसाठी तिने खास लूक केला होता. काळ्या रंगाची साडी आणि डिझायनर ब्लाऊज असा लूक सोनमने केला होता. केसांचा बन बांधत हलका मेकअप तिने केला होता. व्हायरल व्हिडीओत ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
View this post on Instagram
सोनमने अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेली साडी परिधान केली होती. सोनमसोबत येथे रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, अनन्या पांडे, जान्हवी कपूर आणि मनीष मल्होत्रा यांसारखे अनेक स्टार्सही उपस्थित होते. Sonam Kapoor |
दरम्यान, सोनमने बिजनेसमॅन आनंद अहुजाशी २०१८ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर सोनम पहिल्यांदा २०२२ मध्ये आई झाली आणि आता ती २०२६ मध्ये दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. Sonam Kapoor |
हेही वाचा:
पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा; क्रिकेटपटूंसाठी सुवर्णसंधी





